S M L

चेन्नई टेस्टमध्ये भारताचं पारडं जड

10 डिसेंबर, चेन्नई चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर पहिल्या टेस्टसाठी उद्या भारत-इंग्लंडची टीम आमने सामने येतील. वन डे सिरीज 5-0 अशी गमवाव्या लागणार्‍या इंग्लडला टेस्टमध्ये मात्र पराभवाचा वचपा काढायचाय. पण टेस्टमध्ये इंग्लंडच्या तुलनेत भारतीय टीमचंच पारडं जड आहे.केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची टीम टेस्ट मॅच खेळण्यासाठी भारतात परतली खरी, पण आता त्यांच्यासमोर एक नवीन आव्हान आहे आणि हे आव्हान भारताला भारतात हरवण्याचं आहे. गेल्या 23 वर्षांत इंग्लंडला भारतात फक्त एक मॅच जिंकता आली. 1984-85 मध्ये डेव्हिड गॉवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं भारतात टेस्ट सिरीज 2 - 1 नं जिंकली होती. पण यानंतर अशी कामगिरी करणं इंग्लंडला कधीच जमलं नाही. आतापर्यंत भारतात झालेल्या 49 टेस्टपैकी भारताच्या नावावर 13 विजयाची नोंद आहे तर इंग्लंडला 11 टेस्ट मॅच जिंकता आल्यात. आता धोणीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय टीमसमोर आव्हान असणार आहे ते विजयाची ही परंपरा कायम ठेवण्याचं तर इंग्लंडचा कॅप्टन पीटरसनसमोर आव्हान असणार आहे ते पराभवाची मालिका खंडित करण्याचं. भारतासाठी ही सिरीज आणखी काही कारणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये दोन हजार रन्सचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 6 रन्सची गरज आहे. इंग्लंडविरुध्द खेळलेल्या 22 टेस्टमध्ये सचिननं 1994 रन्स केलेत तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅचचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी ' द वॉल ' राहुल द्रविडला हव्यात तीन कॅच. ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉच्या नावावर सर्वाधिक 181 कॅचची नोंद आहे. तर दव्रिडच्या 179 कॅच नावावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 02:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close