S M L

करिअर निवडताना (भाग - 2)

विशेषत: ग्रामीण भागातल्या मुलांपुढे करिअर काय निवडायचं हा प्रश्न असतो. टेक ऑफमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या करिअर निवडीवर मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चान्सलर डॉ. अनिल पाटील आणि करिअर काउन्सलर बाळ सडवेलकर यांनी केलं. करिअर निवडतानाचा दुसरा भाग करिअर निवडतानाच्या पहिल्या पाच पाय-या सांगा ? बाळ सडवेलकर - आत्मनिरीक्षण, ध्येय निश्चिती, अभिरूची निदान, माहिती संकलन आणि नियोजन या करिअर निवडतानाच्या पाच पाय-या आहेत. या पाच पाय-यांपैकी आत्मनिरीक्षण आणि ध्येयनिश्चिती या दोन पाय-या सगळ्यांना ठाऊक आहेत. अभिरूची म्हणजे ऍप्टीट्यूड. तुम्हाला काय आवडतं ? तुम्हाला भाषा आवडते, ललित साहित्य आवडतं, ललित कला आवडतात की तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजीत तुमचा सर्वात जास्त कल आहे, की पोलिटीकल सायन्ससारख्या विषयाकडे कल आहे हे ठरवायचं. आपल्या आवडीच्या विषयांतच आपली प्रगती होते. दहावी - बारावीच्या अगोदरच सर्व विद्यार्थ्यांनी अभिरूची निदान चाचणी म्हणजे ऍप्टीट्यूड टेस्ट करून घ्यायची असते. आवडीच्या विषयात विश्वास ठेवून प्रवेश केल्यास बरीच मजल मारता येते. ग्रामीण विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षा हा करिअरचा एक मोठा स्त्रोत वाटायला लागला आहे. रयत शिक्षण संस्था ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी भरपूर मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांची एमपीएसी परीक्षांची तयारी रयत शिक्षण संस्था कशी करते ? डॉ. अनिल पाटील - एमपीएससीच्या परीक्षेचं काम फार मोठं कठीण नाहीये. साधारण 10 - 12 वर्षांपूर्वी सातरच्या छत्रपती कॉलेजमध्येआम्ही एमपीएससी परीक्षांच्या तयारीचा उपक्रम सुरू केला. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कुठेच कमी नाहीये. पण स्पर्धापरीक्षांमध्ये ही ग्रामीण भागातली मुलं कुठेच दिसत नाहीत. शासकीय पातळीवर ज्यांची निर्णय घेण्याची ज्याची क्षमता असते मग ते आयएस ऑफिसर असोत, शासकीय पातळीवर काम करणारे कर्मचारी असतात, सेक्रेटरी असोत ते ग्रामीण भागातूनच यायला हवेत. हे ध्येय आम्ही डोळ्यासामोर ठेवून आम्ही हा स्पर्धापरीक्षांचा उपक्रम सुरू केला. आमच्या रयत शिक्षण संस्थेतली एमपीएसीच्या परीक्षेसाठी 75 मुलांची निवड झाली आहे. आणि ती सगळीच्या सगळी कला शाखेतली आहेत. ही सर्वसामान्य बुद्धिमत्तेची आहेत. पण या मुलांमध्ये असणारी जिद्द, मला क्लास टू ऑफिसर व्हायचंय हे ध्येय, मला एमपीएसीमध्ये यश मिळवायचं आहे ही महत्त्वाकांक्षा यामुळेच या मुलांची निवड झालीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन पाहिजे. सगळ्या प्रकारच्या पुस्तकांची उपलब्धता हवी. प्रश्नसंच उपलब्ध झाले पाहिजेत. सुदैवानं इंटरनेटसारखं माध्यम उपलब्ध झाल्यानं माहिती लगेचच चटकन आणि झटकन् उपलब्ध होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे माहितीची कमतरता नाहीये. तर माहिती कशी वापरायची हे समजलं पाहिजे. हल्ली नोकरी करायची झाली तर नोकरी लागणा-या ठिकाणी पैसे मागितले जातात. आणि हे विदारक सत्य आहे. तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नोकरी करावी की व्यवसाय करावा ? बाळ सडवेलकर - प्रत्येकानं आपलं जीवन ध्येय निश्चित करायला शिकलं पाहिजे. नोकरी करायची की व्यवसाय करायचा हे आपण कोण व्हायचंय हे याचा विचार केल्यावर, झाल्यावर ठरवायचं. कारण आपल्या शिक्षणाचा फायदा पैसा निर्माण करणं, संपत्ती जमवणं, प्रसिद्धी मिळवणं, दुस-यांना उपयोग होणं यापैकी कोणत्या गोष्टीसाठी करायचा यावर विचारच केला नाही, तर काहीच साध्य होत नाही. म्हणजे काय हवंय, कसं हवंय, कोणत्या पद्धतीनं हवं, आणि कोणाकडून हवंय याचा विचार करत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. थोडक्यात काय तर क्लॅरीटी ऑफ थॉटस्‌ची गरज आहे. डॉ. अनिल पाटील - कोणत्याही जॉबची निवड करताना सध्या कोणत्या प्रकारच्या कामाला सर्वात जास्त डिमांड आहे, कोणत्या क्षेत्राातल्या नोक-यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे, याचा विचार करूनच नोकरींची निवड करावी. कोणाच्यातरी सांगण्यावरून करिअर निवडू नका. तसा चान्सही घेऊ नका. नोकरी सोडली पाहिजे आणि एमपीएसीची परीक्षा दिली पाहिजे, असं बहुतेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. सर तुमचं यावर काय मत आहे ? डॉ. अनिल पाटील - नोकरी सोडून एमपीएससीची परीक्षा देणं योग्य नाही. तर नोकरीकरून परीक्षेची तयारी करावी. यासाठी स्पर्धा परीक्षांच अभ्यास कचांगल्या संस्थेत नाव घालावं. परीक्षेसाठी निवडलेले विषय त्या संस्थेत असले पाहिजेत. कम्युनिकेशन स्किल्सचा खासकरून इंग्रजी भाषेत बोलण्याचा न्यूनगंड ठेवायचा नाही. आम्ही आमच्या इन्स्टिट्युटमधून मुलांच्या प्रत्येक विषयाच्या आठ ते नऊ विषयांच्या परीक्षा घेतो. विद्यार्थ्यांना फीडबॅक देतो. फीडबॅकमुळं ब-याच गोष्टी साध्य होतात. मुलांना त्यांच्या चुका कळतात. मुलांमध्ये प्रचंडप्रमाणात सुधारणा होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2009 01:25 PM IST

करिअर निवडताना (भाग - 2)

विशेषत: ग्रामीण भागातल्या मुलांपुढे करिअर काय निवडायचं हा प्रश्न असतो. टेक ऑफमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या करिअर निवडीवर मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चान्सलर डॉ. अनिल पाटील आणि करिअर काउन्सलर बाळ सडवेलकर यांनी केलं.

करिअर निवडतानाचा दुसरा भाग

करिअर निवडतानाच्या पहिल्या पाच पाय-या सांगा ? बाळ सडवेलकर - आत्मनिरीक्षण, ध्येय निश्चिती, अभिरूची निदान, माहिती संकलन आणि नियोजन या करिअर निवडतानाच्या पाच पाय-या आहेत. या पाच पाय-यांपैकी आत्मनिरीक्षण आणि ध्येयनिश्चिती या दोन पाय-या सगळ्यांना ठाऊक आहेत. अभिरूची म्हणजे ऍप्टीट्यूड. तुम्हाला काय आवडतं ? तुम्हाला भाषा आवडते, ललित साहित्य आवडतं, ललित कला आवडतात की तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजीत तुमचा सर्वात जास्त कल आहे, की पोलिटीकल सायन्ससारख्या विषयाकडे कल आहे हे ठरवायचं. आपल्या आवडीच्या विषयांतच आपली प्रगती होते. दहावी - बारावीच्या अगोदरच सर्व विद्यार्थ्यांनी अभिरूची निदान चाचणी म्हणजे ऍप्टीट्यूड टेस्ट करून घ्यायची असते. आवडीच्या विषयात विश्वास ठेवून प्रवेश केल्यास बरीच मजल मारता येते. ग्रामीण विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षा हा करिअरचा एक मोठा स्त्रोत वाटायला लागला आहे. रयत शिक्षण संस्था ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी भरपूर मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांची एमपीएसी परीक्षांची तयारी रयत शिक्षण संस्था कशी करते ? डॉ. अनिल पाटील - एमपीएससीच्या परीक्षेचं काम फार मोठं कठीण नाहीये. साधारण 10 - 12 वर्षांपूर्वी सातरच्या छत्रपती कॉलेजमध्येआम्ही एमपीएससी परीक्षांच्या तयारीचा उपक्रम सुरू केला. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कुठेच कमी नाहीये. पण स्पर्धापरीक्षांमध्ये ही ग्रामीण भागातली मुलं कुठेच दिसत नाहीत. शासकीय पातळीवर ज्यांची निर्णय घेण्याची ज्याची क्षमता असते मग ते आयएस ऑफिसर असोत, शासकीय पातळीवर काम करणारे कर्मचारी असतात, सेक्रेटरी असोत ते ग्रामीण भागातूनच यायला हवेत. हे ध्येय आम्ही डोळ्यासामोर ठेवून आम्ही हा स्पर्धापरीक्षांचा उपक्रम सुरू केला. आमच्या रयत शिक्षण संस्थेतली एमपीएसीच्या परीक्षेसाठी 75 मुलांची निवड झाली आहे. आणि ती सगळीच्या सगळी कला शाखेतली आहेत. ही सर्वसामान्य बुद्धिमत्तेची आहेत. पण या मुलांमध्ये असणारी जिद्द, मला क्लास टू ऑफिसर व्हायचंय हे ध्येय, मला एमपीएसीमध्ये यश मिळवायचं आहे ही महत्त्वाकांक्षा यामुळेच या मुलांची निवड झालीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन पाहिजे. सगळ्या प्रकारच्या पुस्तकांची उपलब्धता हवी. प्रश्नसंच उपलब्ध झाले पाहिजेत. सुदैवानं इंटरनेटसारखं माध्यम उपलब्ध झाल्यानं माहिती लगेचच चटकन आणि झटकन् उपलब्ध होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे माहितीची कमतरता नाहीये. तर माहिती कशी वापरायची हे समजलं पाहिजे. हल्ली नोकरी करायची झाली तर नोकरी लागणा-या ठिकाणी पैसे मागितले जातात. आणि हे विदारक सत्य आहे. तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नोकरी करावी की व्यवसाय करावा ? बाळ सडवेलकर - प्रत्येकानं आपलं जीवन ध्येय निश्चित करायला शिकलं पाहिजे. नोकरी करायची की व्यवसाय करायचा हे आपण कोण व्हायचंय हे याचा विचार केल्यावर, झाल्यावर ठरवायचं. कारण आपल्या शिक्षणाचा फायदा पैसा निर्माण करणं, संपत्ती जमवणं, प्रसिद्धी मिळवणं, दुस-यांना उपयोग होणं यापैकी कोणत्या गोष्टीसाठी करायचा यावर विचारच केला नाही, तर काहीच साध्य होत नाही. म्हणजे काय हवंय, कसं हवंय, कोणत्या पद्धतीनं हवं, आणि कोणाकडून हवंय याचा विचार करत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. थोडक्यात काय तर क्लॅरीटी ऑफ थॉटस्‌ची गरज आहे. डॉ. अनिल पाटील - कोणत्याही जॉबची निवड करताना सध्या कोणत्या प्रकारच्या कामाला सर्वात जास्त डिमांड आहे, कोणत्या क्षेत्राातल्या नोक-यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे, याचा विचार करूनच नोकरींची निवड करावी. कोणाच्यातरी सांगण्यावरून करिअर निवडू नका. तसा चान्सही घेऊ नका. नोकरी सोडली पाहिजे आणि एमपीएसीची परीक्षा दिली पाहिजे, असं बहुतेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. सर तुमचं यावर काय मत आहे ? डॉ. अनिल पाटील - नोकरी सोडून एमपीएससीची परीक्षा देणं योग्य नाही. तर नोकरीकरून परीक्षेची तयारी करावी. यासाठी स्पर्धा परीक्षांच अभ्यास कचांगल्या संस्थेत नाव घालावं. परीक्षेसाठी निवडलेले विषय त्या संस्थेत असले पाहिजेत. कम्युनिकेशन स्किल्सचा खासकरून इंग्रजी भाषेत बोलण्याचा न्यूनगंड ठेवायचा नाही. आम्ही आमच्या इन्स्टिट्युटमधून मुलांच्या प्रत्येक विषयाच्या आठ ते नऊ विषयांच्या परीक्षा घेतो. विद्यार्थ्यांना फीडबॅक देतो. फीडबॅकमुळं ब-याच गोष्टी साध्य होतात. मुलांना त्यांच्या चुका कळतात. मुलांमध्ये प्रचंडप्रमाणात सुधारणा होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close