S M L

युपीए सरकराची आर्थिक कामगिरी समाधानकारक आहे का ? (भाग - 1 )

16 फेब्रुवारीला युपीएचे प्रभारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना सरकारचं अंतरिम बजेट सादर केलं. त्या बजेटमध्ये देशभरात निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटल्यात. विरोधी पक्षांनी या बजेटला विरोध केला. हे बजेट म्हणजे लॉलिपॉप आहे, असं म्हटलं गेलं तर सत्ताधारी पक्षांनं सामन्य माणसाची काळजी घेत बजेट सादर केलं, असं म्हटलं. आजचा सवालचा प्रश्न बजेटशी संबधित असला त्यात युपीए सरकारच्या गेल्या 5 वर्षांतल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. आजचा सवाल ' चा प्रश्न होता - युपीए सरकराची आर्थिक कामगिरी समाधानकारक आहे का ? या प्रश्नावर चर्चाकरण्यासाठी केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन, अर्थतज्ज्ञ व्ही. एन. जोशी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री एकनाथ खडसे यांचा समावेश होता. युपीए सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प सध्याचा मंदीचा काळ पाहता त्यातल्या त्यात बरा आहे, असं मत भालचंद्र मुणगेकर, रत्नाकर महाजन, व्ही. एन. जोशी यांनी दिलं. तर विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांना अर्थसंकल्प पटला नाही. गेल्या साडेचार वर्षांतली युपीए सरकारची आर्थिक कामगिरी चांगली आसल्याचं मत भालचंद्र मुणगेकर, रत्नाकर महाजन, व्ही. एन. जोशी यांचं पडलं. तर युपीए सरकारची आर्थिक कामगिरी असमाधान कारक असल्याचं राज्याचे माजी अर्थमंत्री एकनाथ खडसे यांनी मतप्रदर्शन केलं. युपीए सरकराची आर्थिक कामगिरी समाधानकारक आहे का ? प्रश्नावर 78 टक्के लोकांनी ' नाही ' हा कौल दिला. " जनतेच्या आणि अर्थतज्ज्ञांच्या मतांत जमीन - आसमानाचा फरक असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे जनतेनं अर्थतज्ज्ञांच्या मतांचा बारकाईनं विचार करावा, " असं सांगत निखिल वागळे यांनी चर्चेचा शेवट केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2009 05:55 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close