S M L

नागपूरच्या जगप्रसिद्ध संत्र्यांवर निसर्गाची अवकृपा

11 डिसेंबर, नागपूरकल्पना नळसकर नागपूरची संत्री जगात प्रसिद्ध असताना इथला संत्री उत्पादक मात्र संकटात सापडलाय. नागपूर जिल्ह्यातील अकराशे गावांमधील 26 हजार 922 हेक्टरवर यावेळी मृगबहार न आल्यानं संत्री उत्पादकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.नागपूरजवळच्या फेटरीमधील बाबूराव ढगेंच्या संत्र्याची बाग संत्र्याला मृगबहार आलाच नाही आणि आता येणारा आंब्या बहार येण्याचीही चिन्हं दिसत नाहीयेत.' यावर्षी पाऊस आला नाही, त्यामुळे मृगबार आला नाही. मागच्या वर्षी आला होता. खूप नुकसान झालं ', असं बाबूराव ढगे सांगत होते. मोजक्याच ठिकाणी मृगबहार आलाय पण किडीमुळं तोही गळून पडलाय. यामुळे अनेक शेतकर्‍यांचं नुकसान झालंय. यंदाच्या कमी पावसामुळे जून, जुलै महिन्यात या संत्र्याच्या झाडाला येणारा मृगबहार आलाच नाही. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍याला 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालंय. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून प्रती झाड 2 हजार रुपये द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेनं केली आहे.जिल्हा परिषदेनं सरकारला सादर केलेल्या नुकसानीच्या अहवालानुसार 33 हजार 988 शेतकर्‍यांचं 50 टक्क्यांच्या वर नुकसान झालं आहे. त्यामध्ये नरखेडतालुक्यातील 155 गावांतील सर्वाधिक 13 हजार 199 हेक्टरवरील संत्र्याचं नुकसान झालंय. त्यापाठोपाठ काटोल तालुक्यातील 189 गावांतील 6 हजार 327 हेक्टरवरील झाडांना संत्र्या आलेल्या नाहीत. कळमेश्वर तालुक्यातील 2 हजार 742 हेक्टर, नागपूर ग्रामीण 1 हजार 185 हेक्टर तर सावनेर तालुक्यातील 1 हजार 480 हेक्टरवरील संत्र्यांचं नुकसान झालंय. ' याआधी कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने प्रती झाड 1 हजार रुपये मदत केली होती. त्याच प्रकारे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मदत करावी पण संत्र्याला जास्त खर्च येतो. त्यामुळे आम्ही दोन हजार रुपये मदत करावी, अशी विनंती केली आहे ' असं जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश माणकर यांनी सांगितलं. शेतकर्‍यांकरता रोख पीक असणार्‍या संत्र्यांवर निसर्गाची अवकृपा झाल्यानं उत्पादक संकटात सापडलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 08:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 08:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close