S M L

तयारी MPSC ची (भाग - 2)

तयारी MPSC ची (भाग - 2) इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ? आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ? आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं. डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ? आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी. ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ? आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्याासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2009 08:42 AM IST

तयारी MPSC ची (भाग - 2)

इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ? आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ? आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं. डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ? आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी. ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ? आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्याासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2009 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close