S M L

दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र- अडवाणी

नवी दिल्ली, 11 डिसेंबर लोकसभेच्या अधिवेशनात आज मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली. दहशतवादाविरुद्ध आम्ही एक आहोत, अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सभागृहात दिली.'पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं मुख्य केंद्र आहे. अतिरेक्यांवर पाककडून जी कारवाई केली जाते, तिला आपण फसता कामा नये. पाक सरकारनं बंदी घातल्यानंतर तिथल्या दहशतवादी संघटनांनी नावं बदलली आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हात आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. अख्या जगाला माहिती आहे की दाऊद पाकिस्तानात आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र आहे ' , असं लालकृष्ण अडवाणी लोकसभेच्या सभागृहात म्हणाले. तर पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर ताबडतोब कारवाई करावी, असा इशारा परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत भाषणादरम्यान दिला. ' दहशतवाद हा केवळ भारत आणि पाकिस्तानशी संबंधित नाही तर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रश्न आहे. त्याविरोधात जागतिक पातळीववर एकत्रित आलं पाहिजे. हा प्रश्न संयमानंच सोडावयाला पाहिजे ', असं केंद्रीय संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. ते लोकसभेच्या सभागृहात बोलत होते.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम म्हणाले, दहशतवादाचा सामना करण्यासाठी आगामी काळात काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. मी सदस्यांना आवाहन करतो की देशाच्या सुरक्षेशी निगडित लोकसभेत येणारी विधयेकं मंजूर करण्यात यावी. राज्यसभेत ही मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 08:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close