S M L

बायोडेटा ते इंटरव्ह्यू (भाग - 2)

बायोडेटा ते इंटरव्ह्यूचा दुसरा भाग .आपले निरनिराळे इंटरेस्ट असतात ते बायोडेटात कसे लिहिले गेले पाहिजेत ? मंगेश किर्तने : उमेदवाराला गिर्यारोहणाची, फोटोग्राफीची, पॉलिटिक्स या गोष्टींची आवड असेल तर ती त्यांनी सीव्हीत हॉबी म्हणजेच छंद ही कॅटेगरी असते, त्यात लिहिली पाहिजे. तसंच या छंदांचा कामावर परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूवर काय बघतो, याचं भान असलं पाहिजे तर... मंगेश किर्तने : हो. बरोबर आहे. कारण मी पाच ते सहा तास काम करून वेगळ्या प्रकारची हॉबी जोपासणार असेल तर मला माझा मेन रोल करता येईल का, या कामासाठी कंपनीच्या आणि माझ्या सहका-यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करू शकेन का, याचापण विचार केला पाहिजे. तसा बायोडेटा डिझाईन केला पाहिजे. बहुतेकदा बायोडेटा लिहिताना मुलं छंदाच्या कॅटेगिरीत काहीतरी लिहायचं म्हणून लिहितात.पण प्रत्यक्षात उमेदवाराला त्याची माहिती कमी असते. तर अशावेळी उमेदवारांनं काय करावं ?मंगेश किर्तने : उमेदवार त्याच्या बायोडेटात जे काही लिहणार आहे आणि लिहिलं आहे ते तंतोतंत खरं असलं पाहिजे. त्या विषयी उमेदवाराला चांगली माहिती असली पाहिजे. तसंच त्या दृष्टीनं विचार करता आला पाहिजे. म्हणजे उमेदवारला गाण्याचा छंद असेल तर त्याच्याकडे गाण्याचं कलेक्शन असलं पाहिजे. राग संगताची आवड असेल तर त्याविषयीची माहिती असायला हवी. एखादं वाद्य वाजवता त्यावेळी ते शिकण्यासाठी कोणाकडे जातात, शिकणा-याचीही माहिती असायला हवी. आपल्याला इंटरव्ह्यूवरनं एखाद्या छंदाबद्दल माहिती विचारली आणि ती सांगता आलीच नाही, तर आपलं चुकीचं इम्प्रेशन पडतं. इंटरव्ह्यूवरवर विपरित परिणाम होतो. यावरून तुमचा फोकस कळतो. तो किती चांगला आहे याचीही कल्पना येते. एकावेळेला 10 ते 15 छंद असून फायद्याचं नाही. उगाचच काहीतरी भारंभार लिहू नये. नव्या नोकरीसाठी किंवा वेगळ्या प्रकारच्या नोकरीसाठी प्रत्येकवेळा बायोडेटा रिडिझाईन करणं किंवा वेगळ्या प्रकारचा बायोडेटा लिहिणं गरजेचं आहे का ? मंगेश किर्तने : हो. कारण आपण बायोडेटा ते इंटरव्ह्यू या प्रासेसकडे लाइफ जर्नी या पद्धतीनं बघत आहोत. कारण त्यात लिहिलेली माहिती तुम्ही काय करू शकता, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा फोकस, तुम्हाला आलेल्या अनुभवांतून तुम्ही काय शिकला आहात याची कल्पना इंटरव्ह्यूवरला येते. त्यामुळे जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरताना जुन्या नोकरीतून तुम्ही जे काय शिकलात ते लिहिता आलंच पाहिजे. बायोडेटाचा सिक्वेन्स कसा असावा ? बायोडेटाची सुरुवात कशी असावी ? इंटरव्ह्यूला जाताना तुमचा ड्रेस कोड काय असावा ? मंगेश किर्तने : बायोडेटा दोन पद्धतीनं लिहिले जातात. एका बायोडेटाला रिव्हर्स क्रोनोलॉजिकल बायोडेटा म्हणतात. म्हणजे सुरुवातीला तुम्ही सध्या जिथे काम करत आहात तो अनुभव लिहिला जातो. मग त्याच्यानंतर पूर्वीचा अनुभव लिहिला गेला पाहिजे. दुस-या पद्धतीत सर्वात आधी बायोडेटा पर्टिक्युलर्स द्यायचे. त्याच्या नंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर अनुभव लिहिले गेले पाहिजे. या दोन पैकी कोणतीही एक पद्धत फॉलो केली तर चांगलं होईल. फक्त तुमच्या बायोडेटात सिक्वेन्स असणं महत्त्वाचं आहे. त्याही पेक्षा काहीजण करिअर ऑब्जेक्टिव्हजचा वापर करून बायोडेटा लिहितात. त्यात करिअरचे काही विचार असतील तर ते लिहा. नसतील तर लिहून चुका करून लिहू नका. करिअर ऑब्जेक्टिव्हनं जर बायोडेटा लिहिण्याचा प्रयत्न केला तरइंटरव्ह्यूवर त्याचं चांगलं इम्प्रेशन पडतं. तुमचा करिअरचा फोकस कळून येतो.सेल्स प्रोसेससाठी बायोडेटा कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इन्शुरन्स किंवा आणखी काही सेल्सशी निगडीत नोकरीसाठी सर्वात आधी म्हणजे आपला कामाचा अनुभव महत्त्वाचा असत डाय हाड ऍटीट्यूड आहे का, फिजिक फीट आहे का, खूप हिंडावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं तर हे गुण आपल्याकडे असतील तर त्याचा आंतर्भाव , आपल्या बायोडाटात केला पाहिजे. कारण या गुणांचा जास्त उपयोग होण्यासारखा असतो. इन्शुरन्स म्हणजे काय, ऍक्च्युअरीज म्हणजे काय, कोणती स्किम कोणाल चांगली ठरू शकते याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कंपनीत गेल्यावर ट्रेनिंगप्रमाणं माहिती मिळू शकते. पण बेसिक माहिती असणं केव्हाही चांगलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2009 08:09 AM IST

बायोडेटा ते इंटरव्ह्यूचा दुसरा भाग .

आपले निरनिराळे इंटरेस्ट असतात ते बायोडेटात कसे लिहिले गेले पाहिजेत ? मंगेश किर्तने : उमेदवाराला गिर्यारोहणाची, फोटोग्राफीची, पॉलिटिक्स या गोष्टींची आवड असेल तर ती त्यांनी सीव्हीत हॉबी म्हणजेच छंद ही कॅटेगरी असते, त्यात लिहिली पाहिजे. तसंच या छंदांचा कामावर परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूवर काय बघतो, याचं भान असलं पाहिजे तर... मंगेश किर्तने : हो. बरोबर आहे. कारण मी पाच ते सहा तास काम करून वेगळ्या प्रकारची हॉबी जोपासणार असेल तर मला माझा मेन रोल करता येईल का, या कामासाठी कंपनीच्या आणि माझ्या सहका-यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करू शकेन का, याचापण विचार केला पाहिजे. तसा बायोडेटा डिझाईन केला पाहिजे. बहुतेकदा बायोडेटा लिहिताना मुलं छंदाच्या कॅटेगिरीत काहीतरी लिहायचं म्हणून लिहितात.पण प्रत्यक्षात उमेदवाराला त्याची माहिती कमी असते. तर अशावेळी उमेदवारांनं काय करावं ?मंगेश किर्तने : उमेदवार त्याच्या बायोडेटात जे काही लिहणार आहे आणि लिहिलं आहे ते तंतोतंत खरं असलं पाहिजे. त्या विषयी उमेदवाराला चांगली माहिती असली पाहिजे. तसंच त्या दृष्टीनं विचार करता आला पाहिजे. म्हणजे उमेदवारला गाण्याचा छंद असेल तर त्याच्याकडे गाण्याचं कलेक्शन असलं पाहिजे. राग संगताची आवड असेल तर त्याविषयीची माहिती असायला हवी. एखादं वाद्य वाजवता त्यावेळी ते शिकण्यासाठी कोणाकडे जातात, शिकणा-याचीही माहिती असायला हवी. आपल्याला इंटरव्ह्यूवरनं एखाद्या छंदाबद्दल माहिती विचारली आणि ती सांगता आलीच नाही, तर आपलं चुकीचं इम्प्रेशन पडतं. इंटरव्ह्यूवरवर विपरित परिणाम होतो. यावरून तुमचा फोकस कळतो. तो किती चांगला आहे याचीही कल्पना येते. एकावेळेला 10 ते 15 छंद असून फायद्याचं नाही. उगाचच काहीतरी भारंभार लिहू नये. नव्या नोकरीसाठी किंवा वेगळ्या प्रकारच्या नोकरीसाठी प्रत्येकवेळा बायोडेटा रिडिझाईन करणं किंवा वेगळ्या प्रकारचा बायोडेटा लिहिणं गरजेचं आहे का ? मंगेश किर्तने : हो. कारण आपण बायोडेटा ते इंटरव्ह्यू या प्रासेसकडे लाइफ जर्नी या पद्धतीनं बघत आहोत. कारण त्यात लिहिलेली माहिती तुम्ही काय करू शकता, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा फोकस, तुम्हाला आलेल्या अनुभवांतून तुम्ही काय शिकला आहात याची कल्पना इंटरव्ह्यूवरला येते. त्यामुळे जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरताना जुन्या नोकरीतून तुम्ही जे काय शिकलात ते लिहिता आलंच पाहिजे. बायोडेटाचा सिक्वेन्स कसा असावा ? बायोडेटाची सुरुवात कशी असावी ? इंटरव्ह्यूला जाताना तुमचा ड्रेस कोड काय असावा ? मंगेश किर्तने : बायोडेटा दोन पद्धतीनं लिहिले जातात. एका बायोडेटाला रिव्हर्स क्रोनोलॉजिकल बायोडेटा म्हणतात. म्हणजे सुरुवातीला तुम्ही सध्या जिथे काम करत आहात तो अनुभव लिहिला जातो. मग त्याच्यानंतर पूर्वीचा अनुभव लिहिला गेला पाहिजे. दुस-या पद्धतीत सर्वात आधी बायोडेटा पर्टिक्युलर्स द्यायचे. त्याच्या नंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर अनुभव लिहिले गेले पाहिजे. या दोन पैकी कोणतीही एक पद्धत फॉलो केली तर चांगलं होईल. फक्त तुमच्या बायोडेटात सिक्वेन्स असणं महत्त्वाचं आहे. त्याही पेक्षा काहीजण करिअर ऑब्जेक्टिव्हजचा वापर करून बायोडेटा लिहितात. त्यात करिअरचे काही विचार असतील तर ते लिहा. नसतील तर लिहून चुका करून लिहू नका. करिअर ऑब्जेक्टिव्हनं जर बायोडेटा लिहिण्याचा प्रयत्न केला तरइंटरव्ह्यूवर त्याचं चांगलं इम्प्रेशन पडतं. तुमचा करिअरचा फोकस कळून येतो.सेल्स प्रोसेससाठी बायोडेटा कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इन्शुरन्स किंवा आणखी काही सेल्सशी निगडीत नोकरीसाठी सर्वात आधी म्हणजे आपला कामाचा अनुभव महत्त्वाचा असत डाय हाड ऍटीट्यूड आहे का, फिजिक फीट आहे का, खूप हिंडावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं तर हे गुण आपल्याकडे असतील तर त्याचा आंतर्भाव , आपल्या बायोडाटात केला पाहिजे. कारण या गुणांचा जास्त उपयोग होण्यासारखा असतो. इन्शुरन्स म्हणजे काय, ऍक्च्युअरीज म्हणजे काय, कोणती स्किम कोणाल चांगली ठरू शकते याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कंपनीत गेल्यावर ट्रेनिंगप्रमाणं माहिती मिळू शकते. पण बेसिक माहिती असणं केव्हाही चांगलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2009 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close