S M L

दिवसअखेर इंग्लंडच्या 5 विकेटवर 229 रन्स

11 डिसेंबर चेन्नईपहिल्या टेस्ट मॅचचा पहिला दिवसांची सुरवात इंग्लंडच्या बॅट्समननी चांगली केली. अ‍ॅलिस्टर कूक आणि अँड्र्यू स्ट्राऊस यांनी भारतीय बॉलर्सचा सावधपणे मुकाबला करत रन्स वाढवायचं धोरण ठेवलं होतं. शतकी भागिदारी केल्यानंतर अ‍ॅलिस्टर कूक आऊट झाला. पण स्ट्राऊस आणि बेल यांनी आगेकूच सुरुच ठेवली आहे. त्यांनी स्कोअर 150 च्या वर नेला आहे. त्यांना रोखण्यासाठी धोणीने मिश्रा आणि हरभजन यांना नेहमीपेक्षा लवकर बॉलिंगसाठी आणलं. पण दोघांना त्यांनी दाद दिली नाही. अखेर हरभजनच्या बोलिंगवर कूकचा संयम सुटला आणि झहीर खानकडे कॅच देऊन तो आऊट झाला.त्याने 52 रन्स केले. त्यानंतर आलेला इयान बेलला एलबीडब्ल्यू आऊट करत झहीर खानने मॅचमधली आपली पहिली विकेट घेतली. लंचनंतरअँड्र्यू स्ट्राऊसने आपली सेंच्युरी पूर्ण केली त्यावेळी इंग्लंडचा स्कोअर 3/183 झाला होता. इंग्लंडचा कप्तान पीटरसन फक्त चारच धावा करू शकला झहीर खानने त्याला आऊट केलं. टी टाइमनंतर इंग्लंड बॅटसमन फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत कॉलिंगवूड फक्त 9रन्स करू शकला हरभजनने त्याला आऊट केलं. स्ट्राऊसने उपयुक्त 123 करून टीमला दिवसअखेर चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फ्लिंटॉफ 18 आणि अ‍ॅडरसन 2 रन्सवर खेळत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 12:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close