S M L

दहशतवादाविरोधातील लढा जिंकू - राहुल गांधी

11 डिसेंबर, नवी दिल्लीलोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मुंबईवरील दहशतवादी हल्ले हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. पंतप्रधान मनमोहन सिंग, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री शिवराज पाटील, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी आदी ज्येष्ठ नेत्यांनी यावर लोकसभेच्या विशेष अधिवेशनात भाषणं केली. तरुण खासदारांमध्ये मिलिंद देवरा आणि राहुल गांधी यांनी यावेळी भाषणं केली. राहुल गांधी यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण भारतीय म्हणून एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलं. ' दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला करताना हिंदू- मुस्लीम, उच्च-नीच हे न पाहता भारतीय म्हणून हल्ला केलाय. जर आपले शत्रू आपल्याला एक म्हणून पाहत असतील तर आपणही एकत्र आलं पाहिजं ', असं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात निवेदन सादर करताना सांगितलं. ' दहशतवादाविरोधात आपण लढा देऊ. हा लढा आपण नक्की जिंकू. दहशतवाद्यांचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत ', असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुंटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं. यावेळी लोकसभा सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रियंका वढेरा ही उपस्थित होत्या

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 01:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close