S M L

हरवलेल्या मुली - भाग 2

हरवलेल्या मुली - भाग 2आजही काही समाजात मुलींना जन्मताच मारून टाकण्याची प्रथा आहे. बंजा-यांच्या तांड्यावर गेलं की काम उपसणा-या मुली दिसतात. इथे त्यांच्या शिक्षणाची आबाळ, कारण मुलींच्या शिक्षणाला किंमत नाही. बाईच्या मताला किंमत नाही. पण सण सुरू झाले की इथे स्त्रीचं राज्य असतं. होळीसारख्या सणात तांडातांड्यात त्या फेर धरून नाचतात.सण कसा साजरा करायचा हजाराच्या वस्तीत नियोजन कसं करायचं तेही त्याच ठरवतात. या सगळयाची एक लीडर असते. तांड्याची नायकीण, गावातल्या इतर बुजुर्ग महिलांसोबत ती गटात वावरते.पण तिच्या या भूमिकेला एक दु:खाची झालरही असते. बाई म्हणून जन्माला तर आलो.पण जगण्याचा हक्क असेलच असं नाही.बंजारा समाजातल्या बुजुर्ग महिला सांगतात, हो मुलींना मारावं लागतं. जास्त मुली आम्हा गोरगरिबांना कुठे परवडतील. पूर्वीपासून असंच चालत आलेलं आहे.या समाजात लग्नासाठी मुलगी देताना मुलाला करार द्यावा लागतो. करार म्हणजे पैसा- दागिने. या सर्व प्रथाविरोधात तोंडातून ब्र काढला तर समाज बहिष्कार टाकेल याची भीती सर्वांना आजही आहे. पण अन्यायाविरोधात आवाज उठवला गेला. बंजारा तांड्यात जन्मलेल्या जीजा राठोडने ब्र काढला. जीजानं गावातल्याच तीन मुलींना वाचवलं.जीजा सांगते, बंजारा समाजात पहिली मुलगी झाली ती तिला जगू देतात. पण दुसरी झाली की तिला जगू देत नाहीत. तंबाखू वगैरे घालून मुलींना संपवून टाकतात. ज्या तीन मुलींना वाचवल. त्या तिघींना जन्मल्यानंतर जीजा राठोडनं त्यांना स्वत:कडे ठेवलं त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन केलं अशा प्रकारे त्यामुली वाचल्या. जीजा सांगते, माझी आजी असताना जर हजार मुलगे असतील तर 200 ते 300 मुली असायच्या पण आता ते प्रमाण थोडं वाढलेलं आहे. असं असलं तरी इतर समाजाच्या दृष्टीने ते खूप कमी आहे. बंजा-याच्या तांड्यांमधल्या या हरवलेल्या मुली शोधायचं काम जीजा करतेय.संघर्ष करतेय परंपरेने जखडलेल्या आपल्याच समाजाच्याविरोधात.परंपरांच्या नावाखाली समाजात वाईट चालीरिती आल्या. अगदी शहरंसुद्धा यापासून लांब राहिलेली नाहीत. मुली कमी झाल्यामुळे आता लग्न जमायलाच अडचणी येऊ लागल्यात.लेवा युवक संघाने लग्न जमवण्यासाठी लेवा पाटील समाजाची वेबसाईट www.shubhleva.com सुरू केली.त्याला फक्त एक महिना झालाय. पण इथे नोंदणी करणा-यांमध्ये मुलीच जास्त आहेत.लेवा युवक संघाचे नितीन नेमाडे सांगतात, सध्या लेवा समाजात वधू जास्त शिकलेली आहे. आणि वर कमी शिकलेले आहेत. त्यामुळे शिकलेल्या वराच्या अपेक्षेने इंटरनेटवर आपली माहिती टाकणा-या मुलींची संख्या जास्त आहे. पण याचा अर्थ मुली मुलांपेक्षा जास्त आहेत असं नाही. त्या संख्येने कमीच आहेत. कारण हुंडा पद्धती. तेव्हा त्यांना असं वाटायचं की, मुलगी शिकली की मुलीला लग्नात खर्च येतो. रिस्क नको म्हणून असा विचार 20 वर्षांपूर्वी पालकांनी केला आणि पर्यायाने आज अशी परिस्थिती की मुली कमी झाल्या आहेत.असं असलं तरीही हुंडा द्यावा लागतो. त्यावर लग्नाचा थाटमाटही ठरतो. समाजाच्या पद्धतीत तोडे सोन्याच्या स्वरुपात हा हुंडा दिला जातो. हा हुंडा परस्परसंमतीने दिला जातो.समाजबांधवामध्ये असतो त्यामुळे याची कुठे वाच्यता होत नाही. शहरापासून जरा बाहेर, जवळच्या गावात गेलं की वेगळंच चित्र दिसतं. मुलींना शिकलेले मुलगेच हवे आहेत.जळगाव जिल्ह्यातलं आसोदा गाव इथं बहुतेकजण शेतीचा व्यवसाय करतात नाहीतर मजुरीला जातात. घरादारात फार श्रीमंती नाही. आता या गावात लग्नाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुलांची लग्नच जमत नाहीत. एक काळ असा होता की हुंड्याशिवाय मुलं लग्न करत नव्हती. मुलींची संख्या कमी झाल्याने आता मुलीच मिळत नाही. गावात प्रत्येकाकडे शेती आहे. सधनता आहे आसोदा गावाचे ग्रामस्थ तापीराम चौधरी सांगतात, आमच्या गावात 30- 40 वय झालं तरी मुलगी मिळत नाही. मग लग्न कसं होणार? नागपूरपर्यंत जायचं खेडे पाड्यात जायचं. जात पाळायची नाही. जी मुलगी हो म्हणेल तिला हो म्हणायचं.तिच्याशी संसार करायचा गावात अशी 70 ते 80 लग्न झाली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2009 10:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close