S M L

माथाडी कामगारांचा संप मागे

25 ऑक्टोबरअखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर माथाडी कामगारांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून हा संप पुकारण्यात आला होता. माथाडी कामगारांच्या सर्व मागण्यांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. एपीएमसीवर सरकारचे नियंत्रण हवे, या मुख्य मागणीसाठी माथाडी कामगारांनी हा संप पुकारला होता. या संपाचा फटका सामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता होती. पण आता संप मिटल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 02:34 PM IST

माथाडी कामगारांचा संप मागे

25 ऑक्टोबर

अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर माथाडी कामगारांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून हा संप पुकारण्यात आला होता.

माथाडी कामगारांच्या सर्व मागण्यांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

एपीएमसीवर सरकारचे नियंत्रण हवे, या मुख्य मागणीसाठी माथाडी कामगारांनी हा संप पुकारला होता.

या संपाचा फटका सामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता होती. पण आता संप मिटल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close