S M L

सोलापूरात 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा

26 ऑक्टोबरसोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली. यापैकी 56 पोलिसांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर 7 जणांना केगाव पोलिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी तूळजापूर इथला नवरात्रोस्तवाचा बंदोबस्त आटोपून हे प्रशिक्षणार्थी पोलिस केगाव इथे आले होते. सकाळच्या नाश्त्यात दूध आणि चण्याची उसळ देण्यात आली होती. यानंतर एक तासात पोलिसांना उलट्या आणि डोकेदुखी सुरु झाली. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 11:48 AM IST

सोलापूरात 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा

26 ऑक्टोबर

सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली.

यापैकी 56 पोलिसांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तर 7 जणांना केगाव पोलिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी तूळजापूर इथला नवरात्रोस्तवाचा बंदोबस्त आटोपून हे प्रशिक्षणार्थी पोलिस केगाव इथे आले होते.

सकाळच्या नाश्त्यात दूध आणि चण्याची उसळ देण्यात आली होती.

यानंतर एक तासात पोलिसांना उलट्या आणि डोकेदुखी सुरु झाली.

या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close