S M L

सुनिल गावसकर यांची नवी इनिंग

26 ऑक्टोबरकोची आयपीएल टीमची परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न करणारा पडद्यामागचा वजनदार सुत्रधार कोण आहे हे आता स्पष्ट झाले आहे. या टीमला भारताचा माजी कॅप्टन लिटील मास्टर सुनिल गावसकरचा वरदहस्त असल्याचे आता समोर आले आहे. कोची टीममध्ये 25% शेअर असणार्‍या सत्यजित गायकवाड यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. सुनिल गावसकर कोची टीमच्या क्रिकेटशी संबंधित गोष्टींकडे लक्ष देतील, तसेच टीममध्ये त्यांचाही आर्थिक सहभाग असेल. याअगोदर बीसीसीआयच्या झालेल्या मिटींगमध्ये गावसकर यांची आयपीएल शिस्तपालन समितीमधून उचलबांगडी करण्यात आली होती. यामागे कोची टीममधली त्यांची ही नविन भुमिका कारणीभूत असल्याचं म्हटले जाते आहे. दरम्यान कोची टीममधले अंतर्गत वाद मिटल्यानंतर टीमच्या कामात लक्ष घालायला सुरुवात करेन असे गावसकर यांनी स्पष्ट केले आहे. तर बुधवारी बीसीसीआय सुद्धा नागपुरमध्ये होणार्‍या मिटींगमध्ये कोची टीमबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 12:02 PM IST

सुनिल गावसकर यांची नवी इनिंग

26 ऑक्टोबर

कोची आयपीएल टीमची परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न करणारा पडद्यामागचा वजनदार सुत्रधार कोण आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

या टीमला भारताचा माजी कॅप्टन लिटील मास्टर सुनिल गावसकरचा वरदहस्त असल्याचे आता समोर आले आहे.

कोची टीममध्ये 25% शेअर असणार्‍या सत्यजित गायकवाड यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

सुनिल गावसकर कोची टीमच्या क्रिकेटशी संबंधित गोष्टींकडे लक्ष देतील, तसेच टीममध्ये त्यांचाही आर्थिक सहभाग असेल.

याअगोदर बीसीसीआयच्या झालेल्या मिटींगमध्ये गावसकर यांची आयपीएल शिस्तपालन समितीमधून उचलबांगडी करण्यात आली होती.

यामागे कोची टीममधली त्यांची ही नविन भुमिका कारणीभूत असल्याचं म्हटले जाते आहे.

दरम्यान कोची टीममधले अंतर्गत वाद मिटल्यानंतर टीमच्या कामात लक्ष घालायला सुरुवात करेन असे गावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

तर बुधवारी बीसीसीआय सुद्धा नागपुरमध्ये होणार्‍या मिटींगमध्ये कोची टीमबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close