S M L

बाळासाहेब राजवर बरसले

26 ऑक्टोबरराज ठाकरेंनी काल बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले बाळासाहेब म्हणाले की, शिमगा नसताना आमच्या नावे बोंबा चालूच असतात.आमच्या वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटतं नव्हतं, या शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. अंगाखाद्यावर खेळेलेलं पोर अंगावर आलं, असंही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे. बाळासाहेबांचं प्रसिध्द पत्रक आमच्याच वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ठीक आहे आता बोंब मारताच आहात तर आम्हाला आमच्या पद्धतीनं शिमगा करावाच लागणार!प्रश्न आहे घराणेशाहीचा, सध्या आमची घराणेशाही बरीच वाजत गाजत आहे. खुद्द आमच्या नावानं बोंब मारणारे पोट्टा, हाही घराणेशाहीचाच एक भाग आहे, हे तो सोयीस्करपणे विसरतो.जिथे या शेंबड्याला शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नाही तिथे मीच उद्धवची कार्याध्यक्षपदी निवड केली असे कसे काय म्हणू शकतो? खुद्द आमच्या मराठी बांधवांनी, भगिनी, मातांनी या दोन वाक्यांचा अर्थ कृष्णकुंजवरील शेंबड्यास विचारावा. कृष्णकुंजवरील हा शेंबडा म्हणतो की, म्हणे शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेले करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे शिल्लक आहेत! तुझे मनसेचे उंदीर आजही शिवसेनेच्या खोबर्‍यावरच मनसोक्तपणे जगत आहेत ना? मनोहर जोशींचा वेगळाच सूर ठाकरे विरुध्द ठाकरे या लढाईत मनोहर जोशींनी वेगळाच सूर लावला आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामधले मतभेद वाढू नये असे आजही वाटत आहे. त्यामुळे सेना आणि मराठी माणसांचे नुकसान होते,अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 01:23 PM IST

बाळासाहेब राजवर बरसले

26 ऑक्टोबर

राज ठाकरेंनी काल बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.

त्यानंतर आज बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले बाळासाहेब म्हणाले की, शिमगा नसताना आमच्या नावे बोंबा चालूच असतात.

आमच्या वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटतं नव्हतं, या शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

अंगाखाद्यावर खेळेलेलं पोर अंगावर आलं, असंही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.

बाळासाहेबांचं प्रसिध्द पत्रक

आमच्याच वंशाच्या दिव्यानं आमच्या नावानं बोंब मारावी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

ठीक आहे आता बोंब मारताच आहात तर आम्हाला आमच्या पद्धतीनं शिमगा करावाच लागणार!

प्रश्न आहे घराणेशाहीचा, सध्या आमची घराणेशाही बरीच वाजत गाजत आहे.

खुद्द आमच्या नावानं बोंब मारणारे पोट्टा, हाही घराणेशाहीचाच एक भाग आहे, हे तो सोयीस्करपणे विसरतो.

जिथे या शेंबड्याला शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नाही तिथे मीच उद्धवची कार्याध्यक्षपदी निवड केली असे कसे काय म्हणू शकतो? खुद्द आमच्या मराठी बांधवांनी, भगिनी, मातांनी या दोन वाक्यांचा अर्थ कृष्णकुंजवरील शेंबड्यास विचारावा.

कृष्णकुंजवरील हा शेंबडा म्हणतो की, म्हणे शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेले करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे शिल्लक आहेत! तुझे मनसेचे उंदीर आजही शिवसेनेच्या खोबर्‍यावरच मनसोक्तपणे जगत आहेत ना?

मनोहर जोशींचा वेगळाच सूर

ठाकरे विरुध्द ठाकरे या लढाईत मनोहर जोशींनी वेगळाच सूर लावला आहे.

राज ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामधले मतभेद वाढू नये असे आजही वाटत आहे.

त्यामुळे सेना आणि मराठी माणसांचे नुकसान होते,अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close