S M L

फ्रायडे रिलिज

12 डिसेंबर, मुंबईगेल्या आठवडयात बरेच सिनेमे रिलीज झालेत. मात्र कुठल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. आता या आठवडयात बॉक्स ऑफिसवर दोनच सिनेमे रिलीज होत आहेत. हे दोन्ही सिनेमा बिग बजेट आहेत आणि गंमत म्हणजे दोघांची नावंही लांबलचक आहेत. यातला एक म्हणजे शाहरुखचा ' रब ने बना दी जोडी 'आणि दुसरा कीनू रीव्हजचा 'द डे द अर्थ स्टँड स्टील'. यशराजच्या परंपरेप्रमाणेच 'रब ने बना दी जोडी' या सिनेमाचा आतापर्यंत बराच गाजावाजा झालाय. शाहरूख खान हेच या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे. या सिनेमात शाहरुख आपल्याला दोन रुपांत पाहायला मिळणार आहे. त्यातलं त्याचं एक रुप हे मध्यमवर्गीय असणार आहे. दुस-या रुपातला शाहरुख हा एकदम मॉडर्न लूक असलेला असणार आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठीच शाहरुखला आपलं रुप बदलावं लागतं अशी काहीशी ' रब ने बना दी जोडी ' या सनेमाची कथा आहे. ' रब ने... 'मध्ये किंग खानबरोबर नवी हिरॉइन अनुष्का शर्मा असणार आहे . मुख्य म्हणजे या सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य चोप्रा आहे. ' मोहब्बते 'नंतर म्हणजे तब्बल आठ वर्षांनंतर तो सिनेमा दिग्दर्शित करत आहे. सिनेमाचं संगीत आहे सलीम-सुलेमानचं आहे.शाहरुखला स्पर्धा आहे ती हॉलिवुडच्या कीनू रीव्हज्‌ची. 1951 साली हॉलिवुडमध्ये 'द डे द अर्थ स्टँड स्टील' हा सिनेमा रिलीज झाला होता. आता त्याच नावाने या सिनेमाचा रिमेक येत आहे. कीनू रिव्हज् पुन्हा एकदा SCI-FI सिनेमात दिसणार आहे, पण योवेळेस तो बनलाय एक गूढ एलियन. हा एलियन न्युयॉर्कच्या किनार्‍यावर जहाज घेऊन येतो आणि भल्याभल्यांची झोप उडते. या एलियनला बोलायचंय ते जगभरातल्या नेत्यांशी. कारण त्याला पृथ्वीचं भविष्य माहीत आहे, अशी या सिनेमाची थीम आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगची भीती आहेच. कदाचित यामुळेच निर्मात्यांना 1951 सालचा सिनेमा पुन्हा करावास वाटला असणार. मग कोणता सिनेमा बघणार?

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 02:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 02:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close