S M L

युवराज सिंगची बी श्रेणीत हकालपट्टी

11 नोव्हेंबरयुवराज सिंगच्या दोलायमान कारकीर्दीला आणखी एक धक्का बसला आहे. खराब फॉर्ममुळे सध्या तो टीमबाहेर आहे.आणि त्यातच बीसीसीआयने ए श्रेणीतून बी श्रेणीत त्याची हकालपट्टी केली आहेत. दुसरीकडे सुरेश रैना मात्र बी श्रेणीतून आता ए श्रेणीत आला. श्रीलंकेविरुद्ध पदार्पणातच केलेली टेस्ट सेंच्युरी आणि वन डे मधली सातत्यपूर्ण कामगिरी रैनाच्या मदतीला आली. नव्या करारानुसार, ए श्रेणीत नऊ खेळाडू आहेत. तर बी मध्ये सात आणि सी श्रेणीत सहा खेळाडू आहेत. याशिवाय कराराच्या रकमेतही बीसीसीआयने वाढ केली. ए श्रेणीतल्या खेळाडूंचा करार एक कोटी रुपयांचा बी श्रेणीसाठी पन्नास लाख रुपयांचा तर सी श्रेणीतल्या खेळाडूंचा 25 लाख रुपयांचा करार असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 02:20 PM IST

युवराज सिंगची बी श्रेणीत हकालपट्टी

11 नोव्हेंबर

युवराज सिंगच्या दोलायमान कारकीर्दीला आणखी एक धक्का बसला आहे. खराब फॉर्ममुळे सध्या तो टीमबाहेर आहे.आणि त्यातच बीसीसीआयने ए श्रेणीतून बी श्रेणीत त्याची हकालपट्टी केली आहेत.

दुसरीकडे सुरेश रैना मात्र बी श्रेणीतून आता ए श्रेणीत आला. श्रीलंकेविरुद्ध पदार्पणातच केलेली टेस्ट सेंच्युरी आणि वन डे मधली सातत्यपूर्ण कामगिरी रैनाच्या मदतीला आली.

नव्या करारानुसार, ए श्रेणीत नऊ खेळाडू आहेत. तर बी मध्ये सात आणि सी श्रेणीत सहा खेळाडू आहेत. याशिवाय कराराच्या रकमेतही बीसीसीआयने वाढ केली.

ए श्रेणीतल्या खेळाडूंचा करार एक कोटी रुपयांचा बी श्रेणीसाठी पन्नास लाख रुपयांचा तर सी श्रेणीतल्या खेळाडूंचा 25 लाख रुपयांचा करार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close