S M L

राज्यभरात कर्मचार्‍यांचा संप

11 नोव्हेंबरशेट्टी आयोगाच्या शिफारसी ताबडतोब लागू कराव्यात या मागणीसाठी राज्यातल्या कोर्टाच्या 30 हजार कर्मचा-यांनी राज्यभरांत संप पुकारला. जळगाव जिल्ह्यातले 850 कर्मचारी या संपात सहभागी झालेत. त्यामुळे जळगावमधल्या सर्व 57 न्यायालयांचे कामकाज ठप्प झाले. यापूर्वी 2 ऑक्टोबरलाही हे कर्मचारी संपावर गेले होते. मात्र त्या संपाचा काहीच परिणाम न झाल्यानं हे कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहे. शेट्टी आयोगाने केलेल्या शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात ही या कर्मचा-यांची मागणी आहे.रिक्रूटमेंट सेलची स्थापना,प्रमोशनरी बेनेफिट वाढवावे,ड्रेस कोड मंजूर झाल्याने दर 3 वर्षांनी कर्मचार्‍याला ड्रेस द्यावा याही त्यांच्या अन्य मागण्या आहेत. जर राज्य सरकारने निधी दिला नाही तर 11 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या कर्मचा-यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 02:54 PM IST

राज्यभरात कर्मचार्‍यांचा संप

11 नोव्हेंबर

शेट्टी आयोगाच्या शिफारसी ताबडतोब लागू कराव्यात या मागणीसाठी राज्यातल्या कोर्टाच्या 30 हजार कर्मचा-यांनी राज्यभरांत संप पुकारला.

जळगाव जिल्ह्यातले 850 कर्मचारी या संपात सहभागी झालेत. त्यामुळे जळगावमधल्या सर्व 57 न्यायालयांचे कामकाज ठप्प झाले.

यापूर्वी 2 ऑक्टोबरलाही हे कर्मचारी संपावर गेले होते. मात्र त्या संपाचा काहीच परिणाम न झाल्यानं हे कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहे. शेट्टी आयोगाने केलेल्या शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात ही या कर्मचा-यांची मागणी आहे.

रिक्रूटमेंट सेलची स्थापना,प्रमोशनरी बेनेफिट वाढवावे,ड्रेस कोड मंजूर झाल्याने दर 3 वर्षांनी कर्मचार्‍याला ड्रेस द्यावा याही त्यांच्या अन्य मागण्या आहेत.

जर राज्य सरकारने निधी दिला नाही तर 11 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या कर्मचा-यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close