S M L

राष्ट्रवादीच्या राजकारणात अस्वस्थांची नवी फळी

10 नोव्हेंबरराष्ट्रवादीच्या राजकारणाने आज नवं वळण घेतले. शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले नेते झाले. पण राष्ट्रवादीत आता नाराज आणि अस्वस्थांची नवी फळी पक्षाअंतर्गतच उभी राहणार हे नक्की आहे.अजित पवारांमागे 99 पैकी तब्बल 73 आमदार उभे राहिले. तेव्हा पक्षाला त्यांना नेता म्हणावचे लागले. भुजबळांनी अजितदादांचे नाव पुढे केले. पण त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय? हा प्रश्न समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. भुजबळ सध्या तरी आपले पत्ते खोलू इच्छित नाही.आक्रमक मराठा आमदार हे अजित पवारांचे समर्थक आहेत. महाराष्ट्रभरातली अशी सगळ्या पक्षांमधली नेतेमंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अजित दादांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अजितदादांना अस्वस्थ ठेवणे योग्य नाही असे पवारांना वाटले असावे. सध्या तरी अजितपवारांची बाजू भक्कम आहे. पण भुजबळ नाराज आहेत. दादांचे जयंत पाटलांशी जमत नाही. विजयसिंग मोहिते पाटील तर एकटे पडले. आर. आर. पाटील अजित पवारांना नेते म्हणून स्वीकारतील असे कुणालाच वाटत नाही. पक्षातल्या या मातब्बर नाराजांना एकत्र येऊ न देणे याची काळजी घेतच अजित पवारांना आपलं पद निभवावे लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 06:12 PM IST

राष्ट्रवादीच्या राजकारणात अस्वस्थांची नवी फळी

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादीच्या राजकारणाने आज नवं वळण घेतले. शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले नेते झाले.

पण राष्ट्रवादीत आता नाराज आणि अस्वस्थांची नवी फळी पक्षाअंतर्गतच उभी राहणार हे नक्की आहे.

अजित पवारांमागे 99 पैकी तब्बल 73 आमदार उभे राहिले. तेव्हा पक्षाला त्यांना नेता म्हणावचे लागले. भुजबळांनी अजितदादांचे नाव पुढे केले.

पण त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय? हा प्रश्न समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. भुजबळ सध्या तरी आपले पत्ते खोलू इच्छित नाही.

आक्रमक मराठा आमदार हे अजित पवारांचे समर्थक आहेत. महाराष्ट्रभरातली अशी सगळ्या पक्षांमधली नेतेमंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अजित दादांच्या संपर्कात आहेत.

त्यामुळे अजितदादांना अस्वस्थ ठेवणे योग्य नाही असे पवारांना वाटले असावे. सध्या तरी अजितपवारांची बाजू भक्कम आहे. पण भुजबळ नाराज आहेत.

दादांचे जयंत पाटलांशी जमत नाही. विजयसिंग मोहिते पाटील तर एकटे पडले. आर. आर. पाटील अजित पवारांना नेते म्हणून स्वीकारतील असे कुणालाच वाटत नाही.

पक्षातल्या या मातब्बर नाराजांना एकत्र येऊ न देणे याची काळजी घेतच अजित पवारांना आपलं पद निभवावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close