S M L

आरटीओच्या कारवाई 200 कोटीचं गूढ !

11 नोव्हेंबरअँण्टी करप्शन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून आरटीओ कार्यालयांवर कारवाई सुरु आहे. या कारवाईत आरटीओ विभागात कर्मशियल गाड्यांच्या टॅक्स प्रकरणात सुमारे 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तर या प्रकरणात अँण्टी करप्शन विभागाने तब्बल लाखांच्यावर फाईली जप्त केल्या आहेत. प्रत्येक कर्मशिअल वापराच्या वाहनाला वर्षाला टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स त्या गाडीच्या क्षमतेवर आणि तिच्या मॉडेलवर भरावा लागतो. मात्र, या टॅक्स भरण्याच्या पद्धतीला छेद देऊन आरटीओ कार्यालयात सर्रासपणे हा टॅक्स चोरीचा गैरव्यवहार सुरु होता.पूर्वी गाडी मालक प्रोफेशनल टॅक्स सेल्स टॅक्स विभागाकडे भरत होते.यावेळी गाडी मालकाला आणखी एका कार्यालयात धक्के खावे लागत होते. यामुळे राज्य सरकारने हा टॅक्सही आरटीओत भरण्याचा निर्णय 2006 सालात घेतला होता. सरकारचा हा निर्णय योग्यच होता. पण त्यातून आरटीओ कार्यालयाला भ्रष्टाचारासाठी एक कुरण सापडले.प्रोफेशनल टॅक्स चोरीसाठी संबधितांनी एक नामी युक्ती शोधली होती. हे टॅक्स चोर बँकेत टॅक्स भरल्याचे दाखवून ही फसवणूक करत होते. बँकेच्या बोगस चलनांद्वारे टॅक्स भरल्याचे दाखवले जात होते, प्रत्यक्षात हा पैसा सरकारी तिजोरीत न जाता संबंधितांच्या खाजगी तिजोरीत जात होता. विशेष म्हणजे बँकेच्या अशा बोगस चलनांवर आरटीओ कार्यालय टॅक्स भरल्याची नोंद करुन वाहनांच्या परमीटचे नूतनीकरण आणि ट्रान्सफरचा व्यवहार करत होते. मात्र हा सगळा गैरप्रकार आता अँण्टी करप्शनने उघड केला आहे. पहिली कारवाई ठाणे आरटीओ कार्यालयावर झाली. आणि त्यांनतर मग राज्यभर कारवाईचे हे सत्र सुरु राहिले... आतापर्यंत राज्यातील ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर आणि जळगांव या आरटीओ कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.आणि या सर्व ठिकाणी मिळून तब्बल दीड लाखाच्यावर फाईल्स जप्त करण्यात आल्यात. हा सर्व प्रोफेशनल टॅक्स घोटाळा 200 कोटींच्यावर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 03:02 PM IST

आरटीओच्या कारवाई 200 कोटीचं गूढ !

11 नोव्हेंबर

अँण्टी करप्शन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून आरटीओ कार्यालयांवर कारवाई सुरु आहे.

या कारवाईत आरटीओ विभागात कर्मशियल गाड्यांच्या टॅक्स प्रकरणात सुमारे 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

तर या प्रकरणात अँण्टी करप्शन विभागाने तब्बल लाखांच्यावर फाईली जप्त केल्या आहेत.

प्रत्येक कर्मशिअल वापराच्या वाहनाला वर्षाला टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स त्या गाडीच्या क्षमतेवर आणि तिच्या मॉडेलवर भरावा लागतो.

मात्र, या टॅक्स भरण्याच्या पद्धतीला छेद देऊन आरटीओ कार्यालयात सर्रासपणे हा टॅक्स चोरीचा गैरव्यवहार सुरु होता.

पूर्वी गाडी मालक प्रोफेशनल टॅक्स सेल्स टॅक्स विभागाकडे भरत होते.यावेळी गाडी मालकाला आणखी एका कार्यालयात धक्के खावे लागत होते.

यामुळे राज्य सरकारने हा टॅक्सही आरटीओत भरण्याचा निर्णय 2006 सालात घेतला होता. सरकारचा हा निर्णय योग्यच होता. पण त्यातून आरटीओ कार्यालयाला भ्रष्टाचारासाठी एक कुरण सापडले.

प्रोफेशनल टॅक्स चोरीसाठी संबधितांनी एक नामी युक्ती शोधली होती. हे टॅक्स चोर बँकेत टॅक्स भरल्याचे दाखवून ही फसवणूक करत होते.

बँकेच्या बोगस चलनांद्वारे टॅक्स भरल्याचे दाखवले जात होते, प्रत्यक्षात हा पैसा सरकारी तिजोरीत न जाता संबंधितांच्या खाजगी तिजोरीत जात होता.

विशेष म्हणजे बँकेच्या अशा बोगस चलनांवर आरटीओ कार्यालय टॅक्स भरल्याची नोंद करुन वाहनांच्या परमीटचे नूतनीकरण आणि ट्रान्सफरचा व्यवहार करत होते.

मात्र हा सगळा गैरप्रकार आता अँण्टी करप्शनने उघड केला आहे. पहिली कारवाई ठाणे आरटीओ कार्यालयावर झाली. आणि त्यांनतर मग राज्यभर कारवाईचे हे सत्र सुरु राहिले...

आतापर्यंत राज्यातील ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर आणि जळगांव या आरटीओ कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

आणि या सर्व ठिकाणी मिळून तब्बल दीड लाखाच्यावर फाईल्स जप्त करण्यात आल्यात. हा सर्व प्रोफेशनल टॅक्स घोटाळा 200 कोटींच्यावर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close