S M L

ए राजांवर कारवाई होणार?

11 नोव्हेंबरवादग्रस्त टेलेकॉम मंत्री ए राजा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव वाढत आहेत. द्रमुकचे राजा एक लाख 76 हजार कोटी रुपयांच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकले आहेत. सीएजीच्या प्राथमिक अहवालात राजा दोषी आढळले आहे. पण ते द्रमुकचा दलित चेहरा असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला करुणानिधी तयार नाही. गेले दोन दिवस विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज याच एका मुद्द्यावरून बंद पाडले. त्यामुळे कोरियाहून परत आल्यानंतर पंतप्रधान राजांविषयीचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतात परतल्यानंतर ते करुणानिधींना विनंती करून राजांना हटवतील, असे सूत्रांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 04:48 PM IST

ए राजांवर कारवाई होणार?

11 नोव्हेंबर

वादग्रस्त टेलेकॉम मंत्री ए राजा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव वाढत आहेत. द्रमुकचे राजा एक लाख 76 हजार कोटी रुपयांच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकले आहेत.

सीएजीच्या प्राथमिक अहवालात राजा दोषी आढळले आहे. पण ते द्रमुकचा दलित चेहरा असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला करुणानिधी तयार नाही.

गेले दोन दिवस विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज याच एका मुद्द्यावरून बंद पाडले. त्यामुळे कोरियाहून परत आल्यानंतर पंतप्रधान राजांविषयीचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतात परतल्यानंतर ते करुणानिधींना विनंती करून राजांना हटवतील, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close