S M L

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

12 नोव्हेंबरहैद्राबाद येथे दुसर्‍या टेस्टला आज सुरुवात झाली. पहिला दिवस न्यूझीलंडच्या बॅट्समननी गाजवला. टिम मॅकेनटॉशची सेंच्युरी आणि मार्टिन गपटिलची 85 रन्सची इनिंग याच्या जोरावर टीमने पहिल्या दिवशी 4 विकेटवर 258 रन्स असा स्कोअर उभा केला आहे. न्यूझीलंडची सुरुवात आज अडखळती झाली. आणि चौथ्याच ओव्हरमध्ये ब्रँडन मॅॅक्युलम 4 रनवर आऊट झाला. पण त्यानंतर मॅकेनटॉश आणि गपटिल ही जोडी जमली. आणि दोघांनी दीडशे रन्सची पार्टनरशिप करत इनिंगची पायाभरणी केली. गपटिलला प्रग्यान ओझाने 85 रनवर एलबीडब्ल्यू केले. रॉस टेलरही 24 रन करुन आऊट झाला. मॅकेनटॉशने मात्र टेस्टमधली आपली दुसरी सेंच्युरी आज झळकावली. 4 तासांहून जास्त काळ तो पिचवर होता. आणि सेंच्युरीत त्याने 10 फोर आणि 1 सिक्स मारला. सेंच्युरी पूर्ण झाल्यावर मात्र तो लगेच आऊट झाला. झहीरने त्याला क्लीनबोल्ड केले. खेळ संपला तेव्हा जेसी रायडर 24 आणि हॉपकिन्स 1 रनवर नॉटआऊट होते. भारतातर्फे झहीरने 2 तर ओझा आणि श्रीसंतने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 03:53 PM IST

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

12 नोव्हेंबर

हैद्राबाद येथे दुसर्‍या टेस्टला आज सुरुवात झाली. पहिला दिवस न्यूझीलंडच्या बॅट्समननी गाजवला.

टिम मॅकेनटॉशची सेंच्युरी आणि मार्टिन गपटिलची 85 रन्सची इनिंग याच्या जोरावर टीमने पहिल्या दिवशी 4 विकेटवर 258 रन्स असा स्कोअर उभा केला आहे.

न्यूझीलंडची सुरुवात आज अडखळती झाली. आणि चौथ्याच ओव्हरमध्ये ब्रँडन मॅॅक्युलम 4 रनवर आऊट झाला.

पण त्यानंतर मॅकेनटॉश आणि गपटिल ही जोडी जमली. आणि दोघांनी दीडशे रन्सची पार्टनरशिप करत इनिंगची पायाभरणी केली.

गपटिलला प्रग्यान ओझाने 85 रनवर एलबीडब्ल्यू केले. रॉस टेलरही 24 रन करुन आऊट झाला. मॅकेनटॉशने मात्र टेस्टमधली आपली दुसरी सेंच्युरी आज झळकावली.

4 तासांहून जास्त काळ तो पिचवर होता. आणि सेंच्युरीत त्याने 10 फोर आणि 1 सिक्स मारला. सेंच्युरी पूर्ण झाल्यावर मात्र तो लगेच आऊट झाला.

झहीरने त्याला क्लीनबोल्ड केले. खेळ संपला तेव्हा जेसी रायडर 24 आणि हॉपकिन्स 1 रनवर नॉटआऊट होते. भारतातर्फे झहीरने 2 तर ओझा आणि श्रीसंतने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close