S M L

आँग साँग स्यू की यांची 15 वर्षांनंतर सुटका

12 नोव्हेंबरम्यानमारमधल्या लोकशाहीवादी नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सॅन स्यू की यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 15 वर्षांपासून म्यानमारच्या लष्करी राजवटीने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यांच्या शिक्षेची मुदत उद्या संपत आहे पण घोषणा केल्याप्रमाणे सरकार खरंच उद्या त्यांना सोडेल काय, याबद्दल स्यू की यांच्या समर्थकांना शंका आहे.गेल्या 15 वर्षांपासून आँग सॅन स्यू की नजरकैदेत आहेत. त्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यासाठी लष्करी सरकारने नेहमी वेगवेगळी कारण शोधल्याचा स्यू की समर्थकांचा आरोप आहे. इतकी वर्षं नजरकैदेत राहूनही स्यू की यांचं जनमत मात्र कायम असल्याचा त्यांचा दावा आहे. म्यानमारमधल्या विरोधी पक्षांत मात्र मतभेद आहेत. तर नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मतांनी जिंकल्याचा दावा लष्करी सरकारला समर्थन असणार्‍या पक्षांनी केला आहे.या निवडणुका निष्पक्ष झाल्याचं म्यानमारच्या सरकारी मीडियाचं म्हणणं आहे. पण निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ठेवला आहे. काही विरोधी पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला होता. पण स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षानं निवडणकीवर बहिष्कार टाकला. म्यानमारमधल्या सध्याच्या परिस्थितीत बदल होण्याची आशा खूप कमी जणांना वाटते. 2007 मध्ये बौद्ध भिक्खूंनी केलेलं आंदोलन लष्करी राजवटीने निर्दयपणे चिरडून टाकले होते. आँग सॅन स्यू की यांची सुटका झाली तरी लष्करी राजवटीशी टक्कर देण्याइतकी ताकद मिळवण्यासाठी विरोधकांना खूप वेळ लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 05:19 PM IST

आँग साँग स्यू की यांची 15 वर्षांनंतर सुटका

12 नोव्हेंबर

म्यानमारमधल्या लोकशाहीवादी नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सॅन स्यू की यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तब्बल 15 वर्षांपासून म्यानमारच्या लष्करी राजवटीने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यांच्या शिक्षेची मुदत उद्या संपत आहे पण घोषणा केल्याप्रमाणे सरकार खरंच उद्या त्यांना सोडेल काय, याबद्दल स्यू की यांच्या समर्थकांना शंका आहे.

गेल्या 15 वर्षांपासून आँग सॅन स्यू की नजरकैदेत आहेत. त्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यासाठी लष्करी सरकारने नेहमी वेगवेगळी कारण शोधल्याचा स्यू की समर्थकांचा आरोप आहे.

इतकी वर्षं नजरकैदेत राहूनही स्यू की यांचं जनमत मात्र कायम असल्याचा त्यांचा दावा आहे.

म्यानमारमधल्या विरोधी पक्षांत मात्र मतभेद आहेत. तर नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मतांनी जिंकल्याचा दावा लष्करी सरकारला समर्थन असणार्‍या पक्षांनी केला आहे.

या निवडणुका निष्पक्ष झाल्याचं म्यानमारच्या सरकारी मीडियाचं म्हणणं आहे. पण निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ठेवला आहे.

काही विरोधी पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला होता. पण स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षानं निवडणकीवर बहिष्कार टाकला.

म्यानमारमधल्या सध्याच्या परिस्थितीत बदल होण्याची आशा खूप कमी जणांना वाटते. 2007 मध्ये बौद्ध भिक्खूंनी केलेलं आंदोलन लष्करी राजवटीने निर्दयपणे चिरडून टाकले होते.

आँग सॅन स्यू की यांची सुटका झाली तरी लष्करी राजवटीशी टक्कर देण्याइतकी ताकद मिळवण्यासाठी विरोधकांना खूप वेळ लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close