S M L

चेन्नई टेस्टमध्ये भारत 241 वर ऑल आऊट

13 डिसेंबर, चेन्नईचेन्नईला सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसर्‍या दिवशीही भारतीय बॅट्समनची सुमार कामगिरी सुरुच राहीली. पहिल्या दिवसाच्या 6 बाद 155 वरुन भारताने डाव सुरु केला. पण भारताचा डाव 241 रन्सवरच गडगडला. आणि इंग्लंडला 75 रन्सची आघाडी मिळाली. कालची धोणी-हरभजन जोडी डाव सावरतील, असं वाटत असतानाच भारताला झटका बसला. मॉण्टी पानेसरने ही जोडी फोडली. त्याने हरभजन सिंगला 40 रन्सवर आऊट केलं. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं टेस्ट मॅचमधली आपली 14 वी हाफ सेंच्युरी ठोकली. पण त्यानंतर मैदानावर आलेला झहीर खानही लगेच आउट झाला. कॅप्टन धोणी एक मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच पानेसरने पुन्हा एकदा आपल्या स्पीनची जादू दाखवली. त्याने धोणीला 53 रन्सवर आऊट केलं. अमित मिश्राने दोन फोर मारत इंग्लंड टीमची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण फ्लिन्टॉफने त्याच्या बोल्ड काढत भारताची पहिली इनिंग संपवली. इंग्लंडने मॅचवर आपलं वर्चस्व कायम राखलंय. त्यामुळे आता भारतीय बॉलर्स काय कमाल दाखवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 07:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 07:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close