S M L

चेन्नई टेस्ट रंगतदार अवस्थेत

13 डिसेंबर चेन्नईचेन्नई टेस्ट आता चांगलीच रंगतदार अवस्थेत पोहचलीय. पहिल्या इनिंगमध्ये 75 रन्सची आघाडी घेतलेल्या इंग्लंडची दुस-या इनिंगमध्ये मात्र डळमळीत सुरुवात झाली. ईशांत शर्मानं ओपनर कुकला 9 रन्सवर आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर लगेचच अमित मिश्राने बेलला आऊट करत इंग्लंडला दुसरा झटका दिला. तर युवराज सिंगनं कॅप्टन पीटरसनला एल्बीडब्ल्यू करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. त्याआधी 6 बाद 155 रन्सवर तिस-या दिवसाचा खेळ सुरू करणा-या भारताला मोठी धावसंख्या करता आली नाही. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि हरभजननं थोडेफार प्रयत्न केले खरे पण अखेर भारताची पहिली इनिंग अवघ्या 241 रन्समध्ये ऑलआऊट झाली. धोणीनं सर्वाधिक 53 रन्स तर हरभजनसिंगनं 40 रन्स केले. तर इंग्लंडतर्फे फ्लिंटॉप आणि पानेसरनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. टी टाइमनंतर इंग्लंडच्या स्ट्रॉस आणि कॉलिंगवूड या दोन बॅटसमनने संयमी खेळ करत रन्स वाढवले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 10:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close