S M L

अहमदनगर टू चायना !

प्राची कुलकर्णी , अहमदनगर22 मार्चरिऍलिटी शोजचं आपल्याकडे सध्या पेव फुटलेलं आहे. प्रत्येक चॅनलवर नवनवीन रिऍलिटी शो लाँच केले जातात. त्यामुळे नवीन कलाकारांच्या कलांना वावही मिळतोय. पण हे झालं भारतातल्या शोजचं. पण भारतातल्या एका कलाकारानं चक्क चीन मधल्या रिऍलिटी शो मध्ये यश मिळवलं आहे.आता चीन मध्ये तो वेगवेगळ्या चॅनल्सवरुन रिऍलिटी शो मध्ये काम करतोय. कुंफूच्या वेडानं अहमदनगरच्या दिलीप चौधरीला थेट चीनपर्यंत पोहचवलं. नगरमध्ये व्हर्का स्कुल मध्ये नोकरी करता करता त्याने पैपै जमवायला सुरुवात केली. पण लागणारा पैसा थोडा थोडका नव्हता त्यासाठी मित्रांनीही साथ दिली.दिलीप चीनमध्ये दाखल झाला. इंग्लिश शिकवणं आणि उरलेल्या वेळात कुंफु शिकणं सुरुच होतं. अशातच एकदा दिलीपला इंटरनेट वरील मैत्रींनी विचारलं की तु कुंफु करतोस तर रिऍलिटी शो मध्ये का जात नाहीस. तिथे कराटे खेळावर रिऍलिटी शो असतो ज्यामध्ये फॉरेनर्सना चीनच्या कला सादर करायचा असतात. यानंतर दिलीपने आपली एक व्हिडिओ टेप त्यांना पाठवली आणि काही दिवसानी फोन आला. यु आर सिलेक्टेड फॉर सेमिफायनल्स..या एका रिऍलिटी शोनं त्याचं आयुष्य बदललं. अवॉर्ड्स मिळाले आणि तो चीनच्या घराघरात पोहचला. दिलीप आता चीनमध्ये स्थायिक झाला आहे. आणि लोकप्रियही..

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 04:15 PM IST

अहमदनगर टू चायना !

प्राची कुलकर्णी , अहमदनगर

22 मार्च

रिऍलिटी शोजचं आपल्याकडे सध्या पेव फुटलेलं आहे. प्रत्येक चॅनलवर नवनवीन रिऍलिटी शो लाँच केले जातात. त्यामुळे नवीन कलाकारांच्या कलांना वावही मिळतोय. पण हे झालं भारतातल्या शोजचं. पण भारतातल्या एका कलाकारानं चक्क चीन मधल्या रिऍलिटी शो मध्ये यश मिळवलं आहे.आता चीन मध्ये तो वेगवेगळ्या चॅनल्सवरुन रिऍलिटी शो मध्ये काम करतोय.

कुंफूच्या वेडानं अहमदनगरच्या दिलीप चौधरीला थेट चीनपर्यंत पोहचवलं. नगरमध्ये व्हर्का स्कुल मध्ये नोकरी करता करता त्याने पैपै जमवायला सुरुवात केली. पण लागणारा पैसा थोडा थोडका नव्हता त्यासाठी मित्रांनीही साथ दिली.

दिलीप चीनमध्ये दाखल झाला. इंग्लिश शिकवणं आणि उरलेल्या वेळात कुंफु शिकणं सुरुच होतं. अशातच एकदा दिलीपला इंटरनेट वरील मैत्रींनी विचारलं की तु कुंफु करतोस तर रिऍलिटी शो मध्ये का जात नाहीस. तिथे कराटे खेळावर रिऍलिटी शो असतो ज्यामध्ये फॉरेनर्सना चीनच्या कला सादर करायचा असतात. यानंतर दिलीपने आपली एक व्हिडिओ टेप त्यांना पाठवली आणि काही दिवसानी फोन आला. यु आर सिलेक्टेड फॉर सेमिफायनल्स..

या एका रिऍलिटी शोनं त्याचं आयुष्य बदललं. अवॉर्ड्स मिळाले आणि तो चीनच्या घराघरात पोहचला. दिलीप आता चीनमध्ये स्थायिक झाला आहे. आणि लोकप्रियही..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close