S M L

माची सागरगडचे ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित

13 डिसेंबर, रायगड श्वेता पवाररायगड जिल्हा म्हटलं की, डोळ्यासमोर येतात डोंगरकडे, नयनरम्य निसर्ग आणि खळाळणारा समुद्र. सुंदर समुद्र किनार्‍यांमुळे इथे पर्यटकांची ये-जा हल्ली वाढलीय. पण याच जिल्ह्यात डोंगरमाथ्यावर राहणार्‍या शेकडो कुटुंबांना आजही मूलभूत सुविधा मिळत नाही.अलिबागपासून 14 ते 15 किलोमीटरवर असलेल्या माची सागरगडमध्ये अंगणवाडी आजही झाडाखालीच भरते. गावातील ग्रामस्थ 60 वर्ष विकासासाठी धडपडत आहेत.' इमारत नसल्यामुळे मुलांना जंमिनीवर बसावं लागतं. 12 वर्षांपासून इथे इमारत बनणार असल्याचं सांगतात. पण काही होत नाही ', असं इथल्या अंगणवाडी सेविका सांगत होत्या. गवळी आणि आदिवासी समाजाची वसाहत 200 वर्षे जुनी आहे. दगडांनी बनलेला रस्ता आणि पावसाळयात साठलेला एक तलाव हेच यांचं पाण्याचं साधन. ' वर्षानुवर्ष आम्ही इथे राहत आहोत. सोयी-सुविधा नाही. पिण्यास पाणी नाही ', असं ग्रामस्थ रतन नाईक सांगत होत्या. सोयी-सुविधा पुरवायच्या तर वनखात्याचे कडक कायदेही आडवे येतात. अनेक प्रकरणं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. पाण्याची सोय नाही, रस्ता नाही, वीज तर नाहीच नाही. लोकप्रतिनिधीही दिसेनासे झाले आहेत. ' वीजेची सोय नाही. माणूस आजारी पडला तर डोई करुन त्याला अलिबागला न्यावं लागतं ', माची सागरगडचे पोलीस -पाटील महीमत पाटील यांनी सांगितलं. मोर्चे, धरणे, निवडणुकीवर बहिष्कार अशा सर्व प्रकारे गावकर्‍यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवला आहे. सरकारला जाग येईपर्यंत त्यांचा हा संघर्ष सुरुच राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close