S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शनसाठी 90 व्या वर्षीही पायपीट !
  • स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शनसाठी 90 व्या वर्षीही पायपीट !

    Published On: Jul 5, 2011 04:19 PM IST | Updated On: Jul 5, 2011 04:19 PM IST

    सिटीझन जर्नालिस्ट स्वातंत्र्यसैनिक माधव पडळकर 05 जुलैस्वातंत्र्यसैनिकाला पेन्शनसाठी 90 व्या वर्षीही खस्ता खायला लागत आहे. ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगांवमधली. शासनाकडे 1991 सालापासून पाठ पुरावा करुनही स्वातंत्र्यसैनिक माधव सखाराम पडळकर यांना न्याय मिळालेला नाही. त्यांच्यावर कोणत्या प्रकारे अन्याय होत आहे." मी माधव सखाराम पडळकर तथा अप्पा पडळकर स्वातंत्र्यसैनिकांसाठी 20 वर्षे या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेलपाटे घालतो आहे.आणि माझ्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. ते निराकरण करण्यासाठी प्रत्येकाला पत्रव्यवहार केलेला आहे. दरम्यानच्या काळात जे जे कोणी बदल झालेले आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी मुंबईला पत्र व्यवहार केलेला आहे. मुंबईला सुद्धा पाचसहा वेळा कामासाठी गेलेलो आहे. "1991 साली एक बातमी वर्तमान पत्रात आली. 26 जानेवारी 1991 साली जे लोक भुमीगत स्वातंत्र्य सैनिकांसाठी अर्ज करतील. त्याचा अर्ज स्विकारला जाईल. त्या प्रमाणे मी 1991 साली 24 जानेवारी साली इथल्या कलेक्टर कचेरीमध्ये येऊन मुल्ला नावाच्या कर्मचार्‍याकडे अर्ज दिला. त्या अर्जसोबत सहा महिने ज्यांना तुरंगवास भोगावा लागला होता. हे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्याचे प्रशस्तीपत्र द्यायचं होतं. ते त्यांनी आणुन द्या. त्याप्रमाणे त्याच्याकडे आणून दिले होते. आता माझं नव्वद वर्षाचं वय आहे तेव्हा माझी तब्बेत जी आहे कुठल्याही कामासाठी पूर्वीच्या सारखे आता स्टॉमीना राहिलेला नाही. आणि मला खूप इच्छा असून सुद्धा पत्रव्यवहाराचे छाननी करायला वेळ नाही.यांच्याकडून मला पत्राची उत्तर यायला पाहिजेत ति समाधानकारक आलेली नाहीत. आपल्याकडे माझी फाईल आलेली आहे. आणि योग्य ते पेपर्स त्यामध्ये दिलेली आहेत.आपण मागच्या खेपेला सांगीतलेलं होतं. त्याचं पुढं काय झालेलं आहे. यावर अव्वल कारकुन स्वातंत्र्य सैनिक विभागाचे एस.सी.मुल्ला म्हणतात, आपली फाईल सामान्य प्रशासनाकडे गेली आहे. ते सर्व कामकाज ते मंत्र्यालयाकडुन होणार आहे. मंजुरीचा प्रश्न नाही जिल्हाधिकार्‍यांना फक्त शिफारस करण्याचा अधिकार असल्याने ते आम्ही मंत्रालयात पाठविलं आहे. ते तेथुनच निर्णय होणार आहे. त्याची एक कॉपी आपल्याला दिलेली आहे. पण मी स्वातंत्र्य सैनिक आहे की नाही हे अनेकांना माहीत आहे. त्यापैकी शिवाजीराव परुळेकर यांना विचारतो. त्यानाही माझ्यासंबधीची माहिती आहे. त्याच्यामध्ये मी स्वातंत्र्य सैनिक आहे. शिवाजीराव परुळेकर म्हणतात, आता या वयात नव्वदाव्या वर्षी आपल्याला किमान स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता तरी मिळावी यासाठी म्हणून ते झगडत आहे. त्याचं आम्हाला दु:ख होतं. पण आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आता तरी शासनाने डोळे उघडावेत. आणि 91 व्या वर्षी भेट द्यावी अशी आम्ही अपेक्षा करतो. गेल्या वीस वर्षात कलेक्टर कचेरीला आणि मुंबईला चकरा मारतोय. इतक्या वर्षानंतर सुद्धा न्याय मला मिळालेला नाही. याच्यानंतर या वयामध्ये किती चकरा माराव्या लागणार आहेत. न्याय मिळण्यासाठी.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close