S M L
  • नादखुळा फुटबॉल

    Published On: Jul 7, 2011 01:08 PM IST | Updated On: Jul 7, 2011 01:08 PM IST

    कोल्हापूर...ऐतिहासिक खाणाखुणा जपणारे शहर.. कायम गजबजलेलं... कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर कुस्ती उभी राहते. पण आणखी एक खेळ कोल्हापूरकरांच्या नसानसात भिनला आहे. तो म्हणजे शंभर वर्षांची परंपरा असणारा कोल्हापूरचा नादखुळा फुटबॉल. कोल्हापूरला महाराष्ट्राच्या फुटबॉलची पंढरी म्हणलं जातं. आणि का नाही. जितकं प्रेम या कोल्हापूरने कुस्तीवर केलं. अगदी तितकचं प्रेम हे कोल्हापूरकर फुटबॉलवर करत आहेत. कुस्तीचं हे माहेरघर, कोल्हापूर बनली आहे महाराष्ट्रातल्या फुटबॉलची पंढरी.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close