S M L
  • 'मुर्दाड दहशतवाद्यांना घाबरत नाही '

    Published On: Jul 14, 2011 06:08 PM IST | Updated On: Jul 14, 2011 06:08 PM IST

    14 जुलैमुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. आणि मुंबईच जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं. तीन ठिकाणी झालेल्या या स्फोटात 21 जणांचा बळी गेला आहे तर 121 जण जखमी आहे. पण नेहमी दहशतवाद्यांना भीख न घालता ताठ मानेन पुढे जाणार मुंबईकर आज सकाळी घराबाहेर पडला. आणि दाखवून दिले की आम्ही भारतीय आहोत घरात लपून बसणे आम्हाला पटत नाही. आज सकाळी बाँबस्फोटांचे सावट असतानाही मुंबईतील विद्यार्थी धाडसाने शाळेला गेले. विशेषत: त्यांच्या पालकांनीच त्यांना पाठिंबा दिला आहे. आणि आम्ही घाबरलो, तर या मुर्दाड दहशतवाद्यांना आणखी बळ येईल हे उदगार आहेत शाळेत जाणार्‍या मुंबईतील एका चिमुरडीचे.या चिमुरडीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी......

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close