S M L
  • ..त्याला एमबीए करायचं होतं !

    Published On: Jul 14, 2011 05:02 PM IST | Updated On: Jul 14, 2011 05:02 PM IST

    14 जुलैमुंबईत झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांपैकी झवेरी बाजारात झालेल्या स्फोटात पंकज सोनी या मुलाचाही मृत्यू झाला. 21 वर्षांचा पंकज मुंबई सेंट्रलला राहायचा. कुटुंबाचा व्यवसाय सोन्याच्या दागिन्यांचा. पण पंकजला एमबीए व्हायचं होतं. तो वडलांनाही व्यवसायात मदत करायचा. रोज कॉलेजमधून दुकानात जायचा. कालही तो नेहमीप्रमाणेच कॉलेज आटपून झवेरी बाजारात पोचला. वडलांनी सांगितलेलं काम करायचं डोक्यात होतं. पण दुकानात पोचण्याआधीच तो बॉम्बस्फोटाचा बळी ठरला.पंकजला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. पण आज पंकज या जगात नाही. याच्या तीव्र वेदना आणि सरकारबद्दल संताप हे कुटुंब व्यक्त करतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close