S M L
  • ...काम जास्त होत म्हणून ऑफिसला थांबले !

    Published On: Jul 14, 2011 05:28 PM IST | Updated On: Jul 14, 2011 05:28 PM IST

    14 जुलैमीरारोडमध्ये आज शोककळा पसरली. ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मीरारोडमध्ये राहणारे हितेन गाडीया यांचा मृत्यू झाला. हितेन गाडीया हिर्‍यांचे शेअर ब्रोकर होते. ते काळाबादेवीला कामाला जायचे. रोज संध्याकाळी सहा वाजता ते ऑफिसमधून घरी परतायचे. पण काल जास्त काम असल्यामुळे ते ऑफिसमध्येच थांबले. पण त्यानंतर ते घरी परतलेच नाही. ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हितेन यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे काही महिन्यांआधीच लग्न ठरलंय. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण अचानक या आनंदावर विरजण पडलं. हितेन गाडीया आता या जगात नाही. ऑपेरा हाऊसमधल्या बॉम्बनं त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close