S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • साखळी स्फोटाच्या तव्यावर राजकारण्यांची पोळी !
  • साखळी स्फोटाच्या तव्यावर राजकारण्यांची पोळी !

    Published On: Jul 14, 2011 05:49 PM IST | Updated On: Jul 14, 2011 05:49 PM IST

    14 जुलैमुंबईत झालेल्या साखळी स्फोटावरून आता राजकारण सुरू झालं आहे. स्फोटानंतर प्रतिक्रिया देताना प्रत्येक पक्ष आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतोय. स्फोटासारख्या संवेदनशील घटनेचा राजकारणासाठी वापर होतोय.पुन्हा मुंबई हादरली. आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी नेते सरसावले. त्याचवेळी प्रत्येकांनी आपल्याच पक्षाचा राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्नही केला. फक्त संदर्भ बदललाय, त्यांची वक्तव्यं मात्र तीच आहेत. भाजपने या स्फोटांसाठी पाकिस्तानला दोषी धरत काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला.मतांच्या राजकारणासाठी टाडा किंवा पोटासारखा कडक कायदा रद्द करून सरकारने दहशतवाद्यांना मोकळं रान दिल्याचा भाजपचा आरोप आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा परप्रांतीयांवरच सगळं खापर फोडलंय. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी नेहमीच्याच शैलीत सरकारवरच हल्लाबोल केला.तर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी अवेळी वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला. जखमी मुंबईकरांसाठी प्रार्थना वगैरे करण्याचे भान या राजकीय पक्षांना उरलेलं नाही आणि त्याची अपेक्षाही आता मुंबईकर करत नाही.पण किमान बॉम्बस्फोटांसारख्या घटनांतर तरी या नेत्यांनी राजकीय पोळी भाजू नये एवढंच जनतेचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close