S M L

काश्मीरमधील निवडणुकीत 57% मतदान

13 डिसेंबर काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांमधील पाचव्या टप्प्यासाठी 57% मतदान झालं. मतदानादरम्यान पुलवामा जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. विरोधकांनी दगडफेक करून आणि बहिष्काराच्या घोषणा देऊन मतदानात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. पाचव्या टप्प्यामधील 11 मतदार संघात सुमारे साडेआठ लाख मतदार आहेत. कथुआ, हिरानगर या जम्मूतल्या महत्त्वाच्या भागांसह दक्षिण काश्मीरमधल्या सहा मतदारसंघामध्येही मतदान झालं. इथ मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचं प्राबल्य आहे. मात्र यावेळी नॅशनल कान्फरन्सही चांगल्याच तयारीत उतरलं होतं. जम्मूमध्ये अनेक भागातून काँग्रेसलाही चांगलं मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहं. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि चार राज्यांतल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधल्या मतदानाबद्दल फार उत्सुकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 04:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close