S M L
  • अण्णांची आतापर्यंतची उपोषणं

    Published On: Aug 20, 2011 05:21 PM IST | Updated On: Aug 20, 2011 05:21 PM IST

    20 ऑगस्टअण्णा हजारे यांच्या उपोषण आंदोलनाच्या प्रवास 1980 पासून अहमदनगरच्या जिल्हा परिषदेपासून सुरु झाला. तो थेट दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत येवून पोहोचला आहे.अण्णांनी आतापर्यंत एकुण 117 दिवस उपोषण केली. त्यासाठी त्यांनी 15 उपोषण केले आहेत. यापैकी सर्वात मोठं उपोषण 12 दिवसाचं होत तर सर्वात कमी 1, ते 2 दिवसाचे होते. आता त्यांचं 16 वं उपोषण सुरु आहे. त्यंाच्या उपोषणाचा घेतलेला हा आढावा. _________________________________________________उपोषण - 11980 कालावधी - 1 दिवसठिकाण - अहमदनगर जिल्हा परिषद मागणी - राळेगणमधल्या शाळेला मान्यता मिळावीपरिणाम - शाळेला मान्यता _________________________________________________उपोषण - 2 7 जून 1983 कालावधी - 2 दिवस ठिकाण - यादवबाबा मंदिर, राळेगणसिध्दीमागणी - राळेगणसिध्दीतल्या कामांना सरकारी मदत मिळावी परिणाम - सरकारकडून मागण्या मान्य _________________________________________________उपोषण - 320 फेब्रुवारी 1989 कालावधी - 5 दिवस ठिकाण - यादवबाबा मंदिर, राळेगणसिध्दी मागणी - शेतकर्‍यांना अनुदान मिळावे परिणाम - मधुकर पिचड यांनी मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले_________________________________________________उपोषण -420 नोव्हेंबर 1989 कालावधी - 9 दिवस ठिकाण - यादवबाबा मंदिर, राळेगणसिध्दी मागणी - शेतीसाठी वीज मिळावी परिणाम - सरकारकडून नव्या सब डिव्हिजनसाठी 4 कोटी मंजूर _________________________________________________उपोषणो - 51 मे 1994 कालावधी - 6 दिवसठिकाण - संत ज्ञानेश्वर समाधी, आळंदी मागणी - भ्रष्ट अधिकार्‍यांविरुध्द कारवाई व्हावीपरिणाम - 15 दिवसांत चौकशीचे सरकारचे आश्वासन _________________________________________________उपोषणो - 620 नोव्हेंबर 1996 कालावधी - 12 दिवसठिकाण - यादवबाबा मंदिर, राळेगणसिध्दी मागणी - भ्रष्ट मंत्र्यावर कारवाई व्हावीपरिणाम - युती सरकारमधल्या शशिकांत सुतार, महादेव शिवणकर यांचे राजीनामे _________________________________________________उपोषणो - 710 मे 1997 कालावधी - 10 दिवसठिकाण - यादवबाबा मंदिर, राळेगणसिध्दी मागणी - स्वत:च्या ट्रस्टमधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीपरिणाम - सरकारने अहवाल जाहीर केला _________________________________________________उपोषणो - 89 ऑगस्ट 1999 कालावधी - 10 दिवस ठिकाण - संत ज्ञानेश्वर समाधी, आळंदीमागणी - भ्रष्ट अधिकार्‍यांविरुध्द कारवाई व्हावी परिणाम - मध्यस्थीनंतर उपोषण मागे _________________________________________________उपोषणो - 99 ऑगस्ट 2003 कालावधी - 9 दिवस ठिकाण - आझाद मैदान मागणी - भ्रष्ट मंत्र्याची चौकशी व्हावी परिणाम - सावंत आयोगाची स्थापना _________________________________________________उपोषणो - 109 फेब्रुवारी 2004 कालावधी - 9 दिवसठिकाण - राळेगणसिध्दी मागणी - आरटीआय कायद्याची अमलंबजावणी व्हावी परिणाम - आयुक्त आणि अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन_________________________________________________उपोषण - 1124 डिसेंबर 2005कालावधी - 10 दिवस ठिकाण - राळेगणसिध्दी मागणी - सावंत आयोगाने ठपका ठेवलेले मंत्री मंत्रिमंडळात नकोत परिणाम - सरकारने आश्वासन दिले _________________________________________________उपोषणउ - 12 9 ऑगस्ट 2006 कालावधी - 11 दिवस ठिकाण - आळंदी मागणी - आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याविरुध्द परिणाम - सरकारने सुधारणा केली नाही_________________________________________________उपोषण - 132 ऑक्टोंबर 2009 कालावधी - 9 दिवस ठिकाण - राळेगणसिध्दी मागणी - पद्मसिंह पाटील यांच्याविरुध्द कारवाई व्हावीपरिणाम - सरकारचे कारवाईचे आश्वासन _________________________________________________उपोषणो - 1416 मार्च 2010 कालावधी - 5 दिवस ठिकाण - राळेगणसिध्दीमागणी - पतसंस्थांतल्या घोटाळ्यांविरुध्द उपोषणपरिणाम - नवा कायदा तयार करण्यात आला_________________________________________________उपोषण - 155 एप्रिल 2011 कालावधी - 5 दिवसठिकाण - जंतरमंतर, दिल्ली मागणी - लोकपाल विधेयक परिणाम - संयुक्त समिती स्थापन_________________________________________________उपोषण - 1616 ऑगस्ट 2011कालावधी- अजून सुरू आहेस्थळ - तिहार जेल, रामलीला मैदान मागणी - जनलोकपाल विधेयकाचा मसुदा संसदेत आणावापरिणाम - सरकारने विनाअट रामलीला मैदान दिले आणि उपोषण सुरू

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close