S M L
  • गणपती बाप्पांची मूर्ती पण, 'मी अण्णा हजारे'!

    Published On: Aug 26, 2011 03:16 PM IST | Updated On: Aug 26, 2011 03:16 PM IST

    26 ऑगस्टरामलीला मैदानावर अण्णांचे आंदोलन सुरूच आहे तर दुसरीकडे आता भक्तांना गणरायाचे वेधही लागले आहेत. पण अण्णांच्या लोकपालाच्या आंदोलनाची छाप आता गणेशोत्सवावरही पडली. अहमदनगरमधील मुर्तीकार प्रमोद कांबळे यांनी चक्क अण्णांच्या वेशातील गणपतीची मूर्ती बनवली आहे. हातात जनलोकपाल विधेयक घेतलेली, मै हू अण्णा लिहिलेली गांधीटोपी धारण केलेली ही गणेशमुर्ती सध्या नगरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. आपल्या कलेतून अण्णांना पाठिंबा द्यावा यासाठी अश्याप्रकारे कलेचा वापर केल्याचे मुर्तीकारांचे म्हणणं आहे. तर आता सार्वजनिक गणपतीसोबत घरगुती गणपतीसाठीही अशा लहान मूर्ती बनवून द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक मुर्तीकार प्रमोद कांबळे यांच्याकडे करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close