S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मी भावनेच्या भरात बोललो, याबद्दल माफी मागतो - ओम पुरी
  • मी भावनेच्या भरात बोललो, याबद्दल माफी मागतो - ओम पुरी

    Published On: Aug 29, 2011 12:56 PM IST | Updated On: Aug 29, 2011 12:56 PM IST

    29 ऑगस्टरामलीला मैदानावर मी अनपढ आणि गवार या शब्दांचा उच्चार केल्यामुळे मी माफी मागतो. मी संसदेचा आदर करतो असं सांगत अभिनेता ओम पुरी यांनी माफी मागितली. ते आयबीएन लोकमतशी बोलत होते. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उपोषण रामलीला मैदानावर सुरू असताना 26 ऑगस्ट रोजी ओम पुरी यांनी अण्णांची भेट घेतली यावेळी ओम पुरी व्यासपीठावरून बोलतांना थेट खासदारांना अनपढ आणि गवार आहेत अशी टीका केली. त्यांच्या या विधानावर खासदार मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. अभिनेते ओमपुरी यांच्यावर हक्कभंग होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी हक्कभंग समितीकडे पाठवला आहे. ओम पुरी यांनी आज आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी ओम पुरी म्हणाले की, मी जे शब्द वापरले ते खरच चुकीचे होते पण मी अण्णांच्या प्रकृत्तीकडे होत चालले दुर्लक्ष लक्षात घेता भावनेच्या भरात म्हटले होते. मी आपल्या संसदेचा खूप आदर करतो. पण गवार हा शब्द आपण दैनदिन जीवनात सहज वापरले जातात. असं स्पष्टीकरण ओम पुरी यांनी दिले. तसेच मला कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता याबद्दल मी माफी मांगतो असं ही ओमपुरी यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close