S M L
  • हार्बर लाईनवर स्टंटबाज तरुणांचा उच्छाद

    Published On: Aug 29, 2011 05:46 PM IST | Updated On: Aug 29, 2011 05:46 PM IST

    29 ऑगस्टमुंबईत लोकलचा प्रवास हा आपल्या सर्वांचा. रेल्वे प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांकडून नेहमी सुरक्षित प्रवास करा असा सल्ला दिला जातो. मात्र लोकलच्या बाहेर लटकून काही तरुण स्टंटबाजी करत आहे. हार्बर लाईनवर गेल्या काही दिवसांत या स्टंटबाज तरुणांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. या स्टंटबाजीमुळे केवळ त्यांच्याच नाही तर इतर प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकाराकडे रेल्वे पोलिस अक्षम्य दुर्लक्ष्य करतआहेत असा आरोप रेल्वे प्रवाशांकडून केला जातोय. या स्टंटबाजांना कोण रोखणार, असा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close