S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन
  • पुण्यात मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन

    Published On: Sep 11, 2011 03:24 PM IST | Updated On: Sep 11, 2011 03:24 PM IST

    11 सप्टेंबरपुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा गणपती असलेल्या कसबापेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. मानाचा पहिला गणपती असणार्‍या या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीचं ख्याती आहे. बँडपथकासह मखमलीच्या चवर्‍या, फुले आणि रेशमी गोंड्यांनी सजवलेली पालखी आणि झुंबरदार पालखीच्या आत बसलेले बाप्पा असा कसबा गणपतीच्या मिरवणुकीचा थाट असतो. आज दुपारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास कसबा गणपतीचे विसर्जन झाले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close