S M L
  • ...आणि शिक्षक 2 मिनिट म्हणून पळून गेले !

    Published On: Oct 3, 2011 04:26 PM IST | Updated On: Oct 3, 2011 04:26 PM IST

    03 ऑक्टोबरबोगस विद्यार्थी दाखवून सरकारी अनुदान लाटण्याचा प्रकार नांदेडमध्ये उघड झाला. त्यानंतर सरकारने राज्यभरात विद्यार्थी संख्या मोजण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे अनेक शाळांची भंबेरी उडाली. आयबीएन-लोकमतने विद्यार्थ्यांची आयात-निर्यात करणार्‍या अशाच एका संस्थेचा पर्दाफाश केला. नाशिकमध्ये एका ठिकाणी जवळपास पाचशे विद्यार्थी ठेवण्यात आलेत. ज्या जागेवर विद्यार्थी आहेत ती शाळा नाही की हॉस्टेलसुद्धा नाही. मग विद्यार्थ्यांना तिथे का ठेवलंय हे जेव्हा तिथे उपस्थित लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी चक्क पळ काढला. विद्यार्थ्यांनासुद्धा पढवण्यात आलं होतं. त्यांना नीट उत्तरंही देता येत नव्हती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close