S M L
  • राजधानीत फॉर्म्युला वनचा थरार

    Published On: Oct 3, 2011 05:57 PM IST | Updated On: Oct 3, 2011 05:57 PM IST

    अर्णव सेन, नवी दिल्ली03 ऑक्टोबरभारतातली पहिली वहिली फॉर्म्युला वन स्पर्धा आता एका महिन्यावर आलीय. त्यामुळे रेसिंग कार कंपन्यांसाठीही भारत हे मार्केटिंगचे प्रमुख केंद्र बनलं आहे. भारतातल्या रेसिंग प्रेमींनाही त्यामुळे फॉर्म्युला वन गाड्यांचा थरार अनुभवायला मिळतोय. शनिवारी रेड बुल कंपनीच्या रोड शोलाही त्यामुळे दिल्लीकरांनी पुरेपूर प्रतिसाद दिला. दिल्लीत सगळ्यांनाच उत्सुकता होती ती सध्याची फॉर्म्युला वन चॅम्पियन टीम रेड बुलच्या रोड शोची. फॉर्म्युला वन गाड्यांचा वेग आणि थरार अनुभवण्यासाठी राजपथावर लोकांनी गर्दी केली होती. आणि रेड बुल टीमनेही त्यांना निराश केलं नाही. डोनट, 180च्या अंशात गाडी वळवणे ही प्रात्यक्षिक तर ड्रायव्हर्सनी लीलया केली. रोड शो लोकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. कारच्या प्रात्यक्षिकाला जोड होती मोटर सायकलच्या स्टंटची.जमलेल्या कित्येकांनी फॉर्म्युला वन कारही यापूर्वी पाहिली नव्हती. पण काही नशिबवान लोकांना तर या कारला हात लावता आला. हा रेड बुलचा हा रोड शो ऑक्टोबरमध्ये होणार्‍या ग्राँप्रिच्या यशाचीच ग्वाही देत होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close