S M L
  • पिस्तूल उचलण्यासाठी ताकद लागते - अजितदादा

    Published On: Oct 9, 2011 04:32 PM IST | Updated On: Oct 9, 2011 04:32 PM IST

    09 ऑक्टोबरमुंबई तोडण्याचा प्रश्नच नसून गोळ्या घालण्यासाठी पिस्तूल उचलण्याची ताकद लागते अशा शब्दात काल शनिवारी अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचा हा खटाटोप आहे. नेहमी शिवसेना भावनेचा मुद्दा घेऊन लोकांना आपलंस करण्याचा प्रयत्न करत आली आहे. असा खणखणीत टोला अजित पवारांनी लगावला. अजितदादांच्या टीकेला उध्दव ठाकरेंनी ठाकरी शैलीत टोला लगावला. अजित पवार हे दुर्देवाने उपमुख्यमंत्री आहे अशी बोचरी टीका केली. शिवसेनेच्या दसर्‍यामेळाव्यानिमित बाळासाहेबांनी चौफेर तोफ डागली. उद्या जर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर स्वत: हातात पिस्तूल घेऊन गोळ्या घालीन अशी गर्जना बाळासाहेब ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या टीकेला प्रतिउत्तर देत दुसर्‍यादिवशी अजित पवारांनी हल्ला चढवला. आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी आर. आर. पाटलांना चार्ली चॅप्लिनची उपमा दिली होती यावर बोलतांना उपमा आम्हालाही देता येतात मात्र आमची ती संस्कृती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं.काल शनिवारी पुन्हा अजितदादांनी शिवसेनेवर निशाना साधला. मुंबई तोडण्याचा प्रश्नच नसून गोळ्या घालण्यासाठी बंदूक उचलण्याची ताकद लागते. शिवसेना नेहमी भावनेच्या भरात बोलते आणि लोकांना आपलंस करण्याचा प्रयत्न करते. असा टोला अजितदादांनी लगावला. तसेच मराठवाड्यात शिवसेना,भाजप कशी काय वाढली काय तिथे दिलं आहे. असा सवाल ही उपस्थित केला. जर आम्ही टीका करायला सुरूवात केली तर गांगरून जातील असा इशाराही दिला. अजित पवार दुर्देवाने उपमुख्यमंत्री - उध्दव ठाकरेअजितदादांच्या टीकेचा समाचार घेत शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अजित पवार हे दुर्देवाने उपमुख्यमंत्री आहे अशी बोचरी टीका केली. मुंबई जर महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचा प्रश्न नसेल तर बोलता का त्याच्यावर ? राष्ट्रवादीने मुंबईसाठी काही केले का ? आम्ही लवासा काही बांधून मोकळे झालो नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांना महाराष्ट्राचं आकलन नाही असा टोलाही उद्धव यांनी पवारांवर लगावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close