S M L
  • 'हिस्टरी' आता मराठीत !

    Published On: Oct 10, 2011 01:23 PM IST | Updated On: Oct 10, 2011 01:23 PM IST

    10 ऑक्टोबरनुकताच दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला. दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर खर्‍या अर्थाने मराठी भाषेनं सुध्दा सीमोल्लंघन केलं आहे. टीव्ही 18 नेटवर्कने हिस्टरी चॅनल हे मराठीत सुरू केलं आहे. आंतरराष्ट्रीय विषयावरील एकापेक्षा एक माहितीपट, अनेक थरारक गोष्टी...कधीही न पाहिलेल्या गोष्टी दाखवणारं चॅनल म्हणून हिस्टरी चॅनल ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिहास घडवलेलं हिस्टरी चॅनल आता मराठीत इतिहास घडवणार आहे. हिस्टरी चॅनलने आता मराठी भाषेत चॅनल सुरू केलं आहे. टीव्ही 18 नेटवर्कच्या या चॅनलचं काल मोठ्या दिमाकात लाँचिंग झालं. तसेच बंगाली,मल्याळम,पंजाबी इतर प्रादेशिक भाषेतही हिस्टरी चॅनल पाहण्यास मिळणार आहे. या चॅनेलचा ब्रँड अम्बॅसेडर अभिनेता सलमान खान आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close