S M L
  • गझलसम्राट जगजीत सिंग यांचा संगीत प्रवास

    Published On: Oct 10, 2011 05:43 PM IST | Updated On: Oct 10, 2011 05:43 PM IST

    10 ऑक्टोबरजगजित सिंग यांना त्यांच्या वडिलांकडून वारशाने संगीताची देणगी मिळाली होती. गंगानगरमध्ये त्यांनी पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडून दोन वर्ष संगीताचं शिक्षण घेतलं.आपला मुलगा आएएस अधिकारी व्हावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण जगजित सिंग यांचं मात्र एकच स्वप्नं होतं ते म्हणजे गायक होण्याचं. 1965 मध्ये ते मुंबईला आले. यानंतर 1981 मध्ये रमण कुमार दिग्दर्शित प्रेमगीत आणि 1982मध्ये महेश भट्ट यांचा अर्थ सिनेमा हा त्यांच्यासाठी यादगार ब्रेक होता. अर्थमध्ये जगजीत सिंग यांनी संगीतही दिलं होतं. या सिनेमातली प्रत्येक गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. पण त्यानंतर मात्र त्यांनी सिनेमाला दिलेलं संगीत फारसं गाजलं नाही. पण यानंतर आलेली काही सिनेमातील त्यांची गाणी मात्र खूप गाजली. सरफरोश सिनेमातील 'होशवालों को खबर क्या हे गाणं असू दे' किंवा पिंजर सिनेमातील 'हाथ छुटे भी तो हे गाणं असू दे' आजही ही गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य करुन आहेत. आणि त्याचमुळे जगजीत सिंगही मनात सदैव रूंजी घालत राहतीस.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close