S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सांगलीत आंतराष्ट्रीय डॉग शो स्पर्धेची सांगता
  • सांगलीत आंतराष्ट्रीय डॉग शो स्पर्धेची सांगता

    Published On: Oct 16, 2011 03:57 PM IST | Updated On: Oct 16, 2011 03:57 PM IST

    16 ऑक्टोबरसांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देश विदेशातील चारशे कुत्र्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत चीनचा लासापसू, थायलँडचा शीत्सू आणि जर्मनीचा अकिटा हे कुत्रे मुख्य आकर्षण ठरले. स्पर्धेचे पंच म्हणून युक्रेनच्या सुपर मॉडेल नाटालिया आणि आर्यलँडची डरोलिया कॉरेल यांनी काम पाहिलं. या स्पर्धेतील सर्वात मोठा कुत्रा 37 इंच उंचीचा ग्रेड डेन तर सर्वात लहान उंचीचा ची हुआ हुआ हा सहा इंच उंचीचा कुत्रा होता. त्याशिवाय सायबेरीयन हस्की, बॉक्सर, ल्याब्रेडॉर, जर्मन शेफर्ड, रोट व्हेलर या कुत्र्यांचाही समावेष होता. मुंबई कयानीन क्लब आणि सांगली कयानीन क्लब यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close