S M L
  • अजितदादांचा माज जनतेनंच उतरवला - राज ठाकरे

    Published On: Oct 17, 2011 12:29 PM IST | Updated On: Oct 17, 2011 12:29 PM IST

    राष्ट्रवादीचा सत्तेचा माज, पैशांचा माज हा जनतेनं उतरवला अशी सनसनीत चपराक राष्ट्रवादीला जनतेना लगावली आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आज पुण्यात खडकवासला येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांचा पराभव झाला. भाजपचे भीमराव तापकीर 3 हजार 625 मतांनी विजयी झाले आहेत.मनसेचे दिवगंत आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे खडकवासला येथे पोटनिवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. तर त्यांच्या विरोधात भाजपचे भीमराव तापकीर उभे होते. मला या घाणरेड्या राजकारणात उतरायचं नाही अशी स्पष्ट भूमिका घेत राज यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार खडकवासला पोटनिवडणुकीत उतरवला नाही. आज या निवडणुकांचा निकाल भाजपच्या बाजूने लागला. भीमराव तापकीर 3 हजार 625 मतांनी विजयी झाले. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. राष्ट्रवादीचा पराभव हा जनतेनं धडा शिकवला आहे. पैश्याच्या जीवावर निवडणुका लढवायच्या, की आम्ही कोणतीही माणसं विकत घ्यायाची आणि लोकांना गृहीत धरणं हा जो प्रकार केला त्याची ही सनसनीत चपराक बसली आहे. जनतेनंच राष्ट्रवादीचा पैश्याचा माज उतरवला आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close