S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पराभवाला खासदार म्हणून मी जबाबदार - सुप्रिया सुळे
  • पराभवाला खासदार म्हणून मी जबाबदार - सुप्रिया सुळे

    Published On: Oct 17, 2011 01:12 PM IST | Updated On: Oct 17, 2011 01:12 PM IST

    17 ऑक्टोबर पुण्यातील खडकवासला पोटनिवडणुकीत आम्ही मतदारापर्यंत पोहचण्यासाठी कमी पडलो म्हणून आम्हाला पराभावाला सामोर जावं लागलं या पराभवाची जबाबदारी मी स्वत: स्वीकारते अशी कबुली खासदार सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतला दिली. खडकवासला येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मनसेचे दिवगंत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र याठिकाणी भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी 3 हजार 625 मतांनी विजयी झाले. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात येऊन प्रचार केला होता. आज सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत या पराभवासाठी खासदार म्हणून स्वत: जबाबदारी स्वीकारते अशी कबुली दिली. तसेच मागील वर्षी याचं मतदारसंघात 33 हजारांनी पराभव झाला होता आता 3 हजार मतांनी पराभव झाला. नेमक कोणत्याठिकाणी आम्ही कमी पडलो यांचं आत्मचिंतन करू असं सुप्रिया यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close