S M L
  • ऑल्टोला टक्कर देण्यासाठी आली ईऑन !

    Published On: Oct 17, 2011 04:50 PM IST | Updated On: Oct 17, 2011 04:50 PM IST

    17 ऑक्टोबरभारतात छोट्या कारमध्ये विक्रीत अव्वल स्थानी असणार्‍या मारूतीला टक्कर देण्यासाठी हुंदाईने कंबर कसत बाजारात ईऑनही कार दाखल केली आहे. आज ईऑन दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दिमाखात दाखल झाली. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांची पसंती ठरलेल्या मारूती ऑल्टोची आजवर विक्रमी विक्री झाली. मध्यमवर्गीय ग्राहकांची पसंत लक्षात घेऊन मारूतीने ऑल्टो लाँच केली. आता हुंदाईने ऑल्टोला टक्कर देण्यासाठी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नवा ऑप्शन दिला आहे. स्टाईल आणि सुरक्षितता यांची विशेष काळजी ईऑनमध्ये घेण्यात आली आहे. एकूणचं गाडीचा लूक कसा आहे....हे पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close