S M L
  • खुली इको - फ्रेंडली आकाश कंदिल स्पर्धा

    Published On: Oct 18, 2011 01:25 PM IST | Updated On: Oct 18, 2011 01:25 PM IST

    18 ऑक्टोबरजाणीव ग्रुप आणि आयबीएन लोकमत यांच्या संयुक्त विद्यामाने नाशिक शहरात खुली इको - फ्रेंडली आकाश कंदिल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी ही स्पर्धा होत असून नाशिक शहरापुरती मर्यादित आहे. आणि या स्पर्धेत जिंकणार्‍यांसाठी प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये, तृतीय रुपये 5 हजार रुपये आणि रुपये 2000 ची 10 उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठीचे आकाश कंदिल दिनांक 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत जाणीव ग्रुप, अध्यक्ष, गोकूळ पिंगळे, कुसुमाग्रज स्मारकाशेजारी, गंगापूर रोड येथे जमा करावेत. विशेष सुचना म्हणजे या स्पर्धेत प्लॅस्टीक आणि थर्माकोल यांचा वापर करू नये. अधिक माहितीसाठी दूरध्वनी - 2315977, 2384351

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close