S M L
  • राज ठाकरेंनी केली अजितदादांची नक्कल

    Published On: Oct 19, 2011 04:54 PM IST | Updated On: Oct 19, 2011 04:54 PM IST

    19 ऑक्टोबरराज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला. महाराष्ट्रातील सहकार चळवळीतून एकतरी ब्रॅन्ड उभा राहिला का असा सवाल राज ठाकरेंनी केला. आज मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. इंच इंच विकू हा राष्ट्रवादीचा मंत्र असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केला. सहकार बँकिंग क्षेत्रात दबदबा असणार्‍या नलावडेंनी, मनसेत जाण्याचं यापूर्वीचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी मनसेच्या शिशिर शिंदे विरोधात राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूकही लढवली होती. नलावडेंच्या पक्षप्रवेशाने मनसेच्या सहकार बँकिगमधील वजन वाढणार असल्याचे सांगण्यात येतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close