S M L

राणेंनी पुरावे दिल्यास कारवाई करू - मुख्यमंत्री

14 डिसेंबर राणेंनी आरोप करण्यापेक्षा पुरावे दिल्यास सरकार नक्की कारवाई करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अतिरेक्यांशी राजकारण्यांचे संबंध असणं ही गंभीर बाब आहे. राणेंनी आरोप करण्यापेक्षा खरी माहिती दिल्यास मुख्यमंत्री या नात्यानं मी जरूर कारवाई करीन असं आश्वासन त्यांनी दिलं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या 127 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची घोषणाही चव्हाण यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन राणेंनी राजकारण्याचे अतिरेक्यांबरोबर संबंध आहेत असं जाहीर केलं होतं.राणेंच्या विधानावर विरोधी पक्षानींही नारायण राणेंनी सत्य माहिती सरकारला द्यावी असं म्हटलं आहे. तर रामदास कदम यांनी राणेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे.दरम्यान आपल्याला जी माहिती आहे ती मी अधिवेशनात देणार आहे असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 03:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close